Dalimb Bag Agrowon
ॲग्रो गाईड

खतांच्या अति वापरामुळे डाळिंब बागा धोक्यात

प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकरी व लखमापूरचे माजी सरपंच शक्ती दळवी यांनी डाळिंब शेती पूर्ववत होण्यासाठी ‘डाळिंब लागवड ते बहर तंत्रज्ञान’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले.

ॲग्रोवन वृत्तसेवा

लखमापूर, ता. सटाणा : ‘‘भारतात सर्वत्र डाळिंब शेती केली जाते. परंतु दर्जेदार व जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणारे उत्पादन सांगली, साताऱ्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागातच होते. डाळिंब शेती ही या परिसराला निसर्गाने दिलेली देणगी आहे; मात्र येथील डाळिंब बागा धोक्यात येण्यासाठी सिंचनाचे अयोग्य नियोजन व रासायनिक व विद्राव्य खतांचा अतिवापर कारणीभूत आहे,’’ असे मत डाळिंब तज्ज्ञ डॉ. बी. टी. गोरे यांनी व्यक्त केले.

कसमादे येथील डाळिंब क्षेत्र अनेक समस्यांमुळे कमी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकरी व लखमापूरचे माजी सरपंच शक्ती दळवी यांनी डाळिंब शेती पूर्ववत होण्यासाठी ‘डाळिंब लागवड ते बहर तंत्रज्ञान’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले. अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र पवार होते. माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, नानासाहेब दळवी, दिलीप दळवी, केवळ दळवी, दीपक जाधव, रमेश पवार आदी उपस्थित होते.

गोरे म्हणाले, ‘‘शेतकरीच डाळिंब शेती नष्ट करण्यासाठी जबाबदार आहेत. कसमादेत पूर्वीसारखीच डाळिंब शेती फुलविता येऊ शकते. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा वापर गरजेचा आहे. नियोजन केल्यास माती व जमिनीचा पोत बघून लागवड केल्यास डाळिंबाची शेती शंभर टक्के यशस्वी होऊ शकते. बागांसाठी लागणारा सूर्यप्रकाश कायम ठेवण्यासाठी लागवडीचे अंतर व जमिनीचा पोत बघून वाफसा पद्धतीने सिंचन व्यवस्थापन केल्यास रोग व किडींचे नियंत्रण करणे सोपे जाते.

माती, मूळ, खोड, पाने, फळांची घ्यावयाची काळजी, या बाबत त्यांनी तांत्रिक मुद्दे मांडले. यात रासायनिक खते व विद्राव्य खतांचा वापर योग्य प्रमाणात, योग्य फवारण्या व फवारणीच्या वेळा या बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी शक्ती दळवी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT