Green Gram  Agrowon
ॲग्रो गाईड

मूग, उडदावरील कीड व रोगनियंत्रण

मूग, उडीद पिकांमध्ये पहिल्या काही दिवसात मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच पाने अकसणे, पिवळा विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येतो. लक्षणे ओळखून नियंत्रणाचे उपाययोजना करावी.

टीम ॲग्रोवन

डॉ. नंदकुमार कुटे, डॉ.चांगदेव वायळ

मावा :

- प्रौढ व पिले पानातून रस शोषण करतात, त्यामुळे झाडाचा जोम कमी होतो.

-कीड शरीरातून चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते. यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्‍लेषण क्रियेत बाधा येते.

तुडतुडे :

- पिले, प्रौढ पानांच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषण करतात.

- प्रादुर्भाव जास्त झाल्यास रोपांची वाढ खुंटते. कळ्या, फुले व शेंगाची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते.

पांढरी माशी :

- पिले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात. कीड आपल्या शरीरातून चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते. यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा येते.

-मुगामध्ये यलो मोझॅक व्हायरस रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. यामुळे पाने पिवळी पडून वाळतात.

एकात्मिक व्यवस्थापन :

- माती परीक्षणावर आधारित खत मात्रेचा वापर करावा. नत्र खतांचा संतुलित वापर करावा.

- पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे या किडींसाठी पिवळा सापळा आणि फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी निळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा. एकरी २० सापळे वापरावेत.

- निंबोळीवर आधारित कीडनाशक ॲझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) १ मिलि प्रति लिटर पाणी.(ॲग्रेस्को शिफारस)

रोगनियंत्रण ः

पाने आकसणे (लिफ क्रिंकल) :

- हा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार तुडतुडे किडीमुळे होतो.

- कोवळी पाने जास्त प्रमाणात आकसतात.

- वाढ खुंटून फांद्यांची संख्या देखील कमी होते. अशा फांद्यांना फुले व शेंगा लागत नाहीत.

नियंत्रण :

- रोगट झाडे उपटून त्यांचा नाश करावा.

- निंबोळीवर आधारित कीडनाशक ॲझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) १ मिलि प्रति लिटर पाणी.

पिवळा विषाणू :

- हा विषाणूजन्य रोग असून, या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो.

- झाडाची वाढ खुंटते. पानांवर पिवळसर हिरव्या रंगाचे लहान व गोलाकार ठिपके पडतात.

नियंत्रण :

-विषाणूजन्य झाडे उपटून त्यांचा नाश करावा.

- रोगवाहक पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी निंबोळीवर आधारित कीडनाशक ॲझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) १ मिलि प्रति लिटर पाणी. (ॲग्रेस्को शिफारस)

- प्रादुर्भाव जास्त झाल्यास दुसरी फवारणी १० ते १२ दिवसांच्या अंतराने करावी.

संपर्क :

डॉ. नंदकुमार कुटे : ७५८८५१३३९८

डॉ. चांगदेव वायळ : ९९७५५४१९६७

(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT