Cotton Bollworm Control Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Bollworm Control : बोंडअळी ला रोखण्यासाठी फवारणीशिवाय कोणते उपाय आहेत?

Team Agrowon

Cotton Crop : यंदा कपाशीची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झाली. त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होतय. याशिवाय ढगाळ वातावरण असल्याने गुलाबी बोंड अळीचं संकट येण्याची शक्यता आहे. म्हणून कपाशी पिकात कामगंध सापळे लावण्याची हीच योग्य वेळ आहे.  त्यामुळे आतापासूनच निरीक्षण करुन गुलाबी बोंडअळीला रोखता येईल. हे कामगंध सापळे कसे लावायचे? याशिवाय बोंडअळीचं कमी खर्चात सोप्या पद्धतीनं नियंत्रण कसं करायच? याचीच माहिती घेऊया.

ज्याठिकाणी कपाशी ची वेळेवर लागवड झालीय अशा ठिकाणी कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत आहेत. अशा ठकाणी ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग फीरताना दिसताएत. यातील मादी पतंग कपाशीचे पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात. त्यामुळे पुढील काळात कपाशीत गुलाबी बोंडअळी वाढू शकते. या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जर टाळायचा असेल तर काय कराल? तर यावर सोपा उपाय म्हणजे कपाशीचं नीट निरीक्षण करुन गुलाबी बोंडअळी असलेल्या डोमकळ्या तोडा. या डोमकळ्या जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट करा. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावा. जर जास्त प्रमाणात पतंग असतील तर काय करायच? सोपयं ....यासाठी आपल्याला सापळ्याची एकरी संख्या वाढवायचीय म्हणजे  एक एकर क्षेत्रात  ८ ते १० कामगंध सापळे लावाचेत.

बोंडअळीचं जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याची सोपी पद्धत म्हणजे  ट्रायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटक. हे गांधीलमाशीसारखे परोपजीवी कीटक बोंडअळ्या फस्त करतात. म्हणून ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाचे ट्रायकोकार्ड एकरी २-३ या प्रमाणात लावा. लक्षात ठेवा हे ट्रायकोकार्ड पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावायचेत. ट्रायकोकार्ड शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी १० दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी  करायची नाहीए. कारण किटकनाशकामुळे  ट्रायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटकही नष्ट होतात. हे ट्रायकोकार्ड तुम्हाला आपल्या विभागाच्या कृषी विद्यापीठात मिळू शकतील. 

बोंडअळीला रोखण्याचा तीसरा सोपा उपाय म्हणजे पक्षीथांबे लावणे. आपल्याला  कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे लावाचेत. म्हणजे पक्षी या थांब्यावर  बसून शेतातील अळया खातील. याशिवाय  ५ टक्के निंबोळी अर्क किंवा  अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५०० मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना या  बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीत ओल व हवेत आर्द्रता असताना ८०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणात फवारणी करा. अशा प्रकारे गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आत्तापासूनच खबरदारी घेऊन उपाय केल्यास पुढे होणार नुकसान टाळता येतं. 

माहिती आणि संशोधन - कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT