Okra Crop 
ॲग्रो गाईड

कोणत्या जमिनीत घ्यावं भेंडी पीक 

भेंडी या पिकाचे पहिले उगमस्थान हे आफ्रिका देशातील आहे. तर त्यानंतर भारत हे भेंडीचे दुसरे उमगस्थान आहे. भेंडीला वर्षभर मागणी असते. त्यामुळे हे एक नगदी पीक बनत चालले आहे.

टीम ॲग्रोवन

भेंडी या पिकाचे पहिले उगमस्थान हे आफ्रिका देशातील आहे. तर त्यानंतर भारत हे भेंडीचे दुसरे उमगस्थान आहे. भेंडीला वर्षभर मागणी असते. त्यामुळे हे अक नगदी पीक बनत चालले आहे. भेंडीच्या लागवडीमध्ये ठिबक संच, गादीवाफा पद्धत, एकात्मिक अन्नद्रव्ये, कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. वर्षभर चांगला दर मिळत असल्यामुळे आज बरेच शेतकरी या पिकाकडे वळत आहेत.

लागवड योग्य जमीन -  

हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये भेंडी पिकाची चांगली वाढ होते. पाण्याचा योग्य निचरा आणि भरपूर सेंद्रिययुक्त जमीन भेंडीसाठी उत्तम असते. भेंडीच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

हवामान - 

भेंडी पिकाला उष्ण व दमट हवामान मानवते. तापमान १५ अंश सेल्सियस पेक्षा कमी असेल तर बियांची उगवण कमी होते. तसेच तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त झाले तर, फुलांची गळ होते. जास्त दमट हवामानात पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो.

पिकाचे वाण - 

कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या, तसेच नामांकित कंपन्यांच्या भेंडी पिकाच्या विविध संकरित जाती उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या गरजेनुसार व अभ्यासपूर्वक जातींची निवड करावी.

लागवड हंगाम - 

खरीप हंगाम - मे ते जुलैदरम्यान  उन्हाळी हंगाम - फेब्रुवारी ते मार्चदरम्यान

लागवडीच्या पद्धती -  

सरी-वरंबा लागवड :  

शेताची पूर्वमशागत करून ३० किंवा ४५ से.मी. अंतरावर सरी काढून १५ सें.मी. अंतरावर एक बी टोकावे. अशा पद्धतीमुळे एकरी ३ ते ४.५ किलो बियाणे लागते.

गादीवाफा व ठिबकवर लागवड : 

जमिनीची पूर्वमशागत करून पाच फुटांवर लॅटरलचे मार्किंग करून ३ ते ३.५ फूट रुंदीचा गादीवाफा बनवावा. त्यावर मध्यभागी लॅटरल टाकून बेडवर ३० बाय १५ सें.मी. अंतरावर बी टोकावे. यामध्ये एकरी २.५ ते ३ किलो बी लागते. शक्यतो जमिनीच्या मगदुरानुसार दोन किंवा एक लेटरल बेडवर अंथरावी. अशा पद्धतीमध्ये एका बेडवर ६ ते ८ ओळी भेंडी लागवड होते. या पद्धतीमुळे माल तोडणे सोपे जाते व फवारणीसुद्धा करणे सोपे जाते.

लागवडीचे विशेष तंत्र : 

तयार केलेला गादीवाफा दोन ते चार तास ड्रिप चालवून भिजवून घ्यावा. वाफसा आल्यानंतर बी टोकावे. अर्धा ते एक इंच खोलीवर बी टोकावे. टोकण झाल्यावर १५ मिनिटे ड्रिप चालवून बेड भिजू द्यावे. सर्व बियांची उगवण झाली आहे, याची खात्री करावी अन्यथा नांगे बी टोकून भरून घ्यावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT