Natural Farming
Natural Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Soil Health : गंधक जमिनीत कोणत्या स्वरुपात अढळते?

Team Agrowon

तेलबिया पिकांच्या (Oilseed Crops) उत्पादन वाढीसाठी गंधक (Sulpher) हे सुक्ष्मअन्नद्रव्य अतिशय महत्त्वाचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सर्व्हेक्षणानूसार महाराष्ट्रातील बऱ्याच जमिनीत गंधकाची कमतरता (Sulpher Deficiency) अढळून आली आहे. गंधकाचे जमिनीतील स्वरुप आणि गंधकाचे कार्य याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढील माहिती दिली आहे.

जमिनीतील गंधकाचे स्वरुप

गंधक जमिनीत सेंद्रिय आणि असेंद्रिय स्वरूपात आढळते. पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध गंधकाचे जमिनीतील प्रमाण महत्त्वाचे असते. उपलब्ध गंधकाचे प्रमाण जमिनीत एकूण गंधकाच्या दहा टक्क्याहून कमी असते. पिके घेत असलेल्या जमिनीत हे प्रमाण जवळजवळ ५० टक्के असते. 

भारी जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत, कमी निचरा होणाऱ्या जमिनीत आणि क्षारयुक्त जमिनीत उपलब्ध गंधकाचे प्रमाण जास्त असते. 

काही असेंद्रिय स्वरुपातील गंधक त्यांच्या मूलद्रव्यांच्या किंवा सल्फाइड स्वरूपात आढळते. उपलब्ध स्वरूपातील गंधक सल्फेटच्या स्वरूपात असते. 

सेंद्रिय आणि सल्फाईड्स च्या स्वरूपातील गंधकाचे रूपांतर सल्फेटच्या रूपात होण्याकरिता अनेक स्वरूपाच्या क्रिया घडून येतात. 

सेंद्रिय गंधकाची उपलब्धता वाढविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे खनिजीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. 

ज्या जमिनीचे उष्णतामान ३५ ते ४० अंश सेल्सिअस असून ओलाव्याचे प्रमाण महत्तम जलधारण शक्तीच्या ६० टक्के असते अशा जमिनीत सेंद्रिय स्वरुपातील गंधकाचे रुपांतर उपलब्ध गंधकात भरपूर होते. 

सर्वसाधारण आणि अल्क जमिनीत सेद्रिय पदार्थांचे खनिजीकरण आम्ल जमिनीपेक्षा लवकर होते. भारी पोताच्या जमिनीसाठी गंधक सल्फेटच्या स्वरुपात असलेली रासायनिक खते वापरावी. उदा.  जिप्सम, सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी. 

गंधकाचे कार्य 

हरितलवके निर्मितीसाठी गंधक महत्त्वाचे कार्य करते. त्यामुळे पेशींची वाढ होते व झाडांची वाढ चांगली होते. 

गंधक शेंगवर्गीय पिकांच्या मुळावरती गाठी तयार होण्यास मदत करते. पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते.

बियांच्या वाढीसाठीही गंधक महत्त्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT