Onion Disease Agrowon
ॲग्रो गाईड

Onion Disease : ओळखा कांदा पिकावरील करपा रोगाची लक्षणे

सध्या थंडीचा कडाका वाढलेला आहे काही भागात ढगाळ वातावरण आहे. परिणामी या काळात कांदा व लसूण पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

Team Agrowon

सध्या थंडीचा कडाका वाढलेला आहे काही भागात ढगाळ वातावरण आहे. परिणामी या काळात कांदा व लसूण पिकांवर करपा (Wilt) रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पुढील लक्षणे दिसून येतात. करपा रोगाचे दोन प्रकार असतात.

जांभळा करपा

रोगकारक बुरशी ः अल्टरनेरिया पोराय

पानावर सुरवातीला लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. असे अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात. ढगाळ वातावरणात या रोगाची तीव्रता वाढते. रांगडा कांद्यावर तसेच बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकावर आणि लसूण पिकावरही या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

तपकिरी करपा :

रोगकारक बुरशी ः स्टेमफिलीयम व्हेसिकॅरिय

या रोगाचा प्रादुर्भाव रब्बी कांदा व लसूण पिकासह, बीजोत्पादनासाठीच्या कांदा पिकावर दिसून येतो. पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होऊन, वाकून मोडून पडतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रब्बी हंगामात होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT