Sugarcane Red Rot Disease  Agroown
ॲग्रो गाईड

Sugarcane Disease Control : उसावरील लाल कुज नियंत्रण

Sugarcane Red Rot Disease : उसावरील लाल कुज हा बुरशीजन्य राेग महाराष्ट्रात कमी प्रमाणात साेलापूर आणि काेल्हापूर या जिल्ह्यांत नव्यानेच आढळलेला हाेता. सध्या या राेगाचा प्रादुर्भाव राज्यात ऊस पिकामध्ये दिसून येत नसला, तरी हा राेग अतिशय महत्त्वाचा आहे.

Team Agrowon

डाॅ. गणेश काेटगिरे, डाॅ. ए. डी. कडलग, जी. ई. आत्रे

Sugarcane Farming : उसावरील लाल कुज हा बुरशीजन्य राेग महाराष्ट्रात कमी प्रमाणात साेलापूर आणि काेल्हापूर या जिल्ह्यांत नव्यानेच आढळलेला हाेता. सध्या या राेगाचा प्रादुर्भाव राज्यात ऊस पिकामध्ये दिसून येत नसला, तरी हा राेग अतिशय महत्त्वाचा आहे. या राेगामुळे अनुकूल परिस्थितीत ऊस पिकाचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान हाेऊ शकते.

रोगकारक बुरशी ः कोलेटोट्रिकम फालकॅट्म

प्रसार ः ऊस बेणेद्वारे होतो. या राेगास उसाचा कर्कराेग असेही म्हणतात.

या राेगामुळे ऊस पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेते. तसेच रसाची शुद्धता आणि साखर उतारा यामध्ये जास्त घट संभवते. राेगाची लक्षणे पिकाच्या पानांवर तसेच कांड्यावरती दिसून येतात.

लक्षणे ः

प्रामुख्याने पाने आणि कांड्यांवर दिसून येतात.

अ) पानावरील लक्षणे

सुरुवातीस पानाच्या शिरेवर वरील बाजूस लालसर रंगाचे २ ते ३ मिमी लांबीचे आणि ०.५ मिमी रुंदीचे ठिपके आढळतात. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढत जाते. त्यानंतर पाने वाळतात. राेगाची तीव्रता वाढल्यावर शेंड्याकडील सर्व पाने वाळतात.

ब) कांड्यावरील लक्षणे ः

राेगट उसाची पाने वाळल्यानंतर कांड्यावर तपकिरी किंवा लालसर तपकिरी पट्टे आढळतात. कांड्या सुकतात आणि आकसून जातात.

राेगग्रस्त उसाच्या कांड्याच्या आतील भाग पाहिल्यास, त्यावर लाल रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके किंवा पट्टे आढळतात. कांड्यांच्या आतील भाग पाेकळ हाेऊन त्यामध्ये कापसासारखी आणि करड्या रंगाची बुरशीची वाढ आढळून येते.

कांड्याच्या आतील भागाचा वास अल्काेहाेलसारखा येताे.

राेगाची तीव्रता वाढल्यावर आकसलेल्या कांड्यावर काळ्या रंगाच्या असेरुलाई तयार हाेतात. राेगग्रस्त उसाची बेटे निस्तेज हाेऊन वाळतात.

नियंत्रण ः

बेणेमळ्यातील बेणे लागणीकरिता वापरावे. लागणीपूर्वी ऊस बेण्यास कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ मिनिटे प्रक्रिया करावी.

लागण केलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी.

रोगट बेटे खणून काढावीत व त्या ठिकाणी कार्बेन्डाझिम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २ ग्रॅम प्रति लिटर पाणी यापैकी एका बुरशीनाशकाचे द्रावण करून आळवणी करावी. तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैवबुरशीनाशकाचा वापर करावा.

रेड रॉट झालेल्या उसाचा खोडवा न घेता त्या शेतात द्विदल धान्याचे पीक घेऊन फेरपालट करावी.

पानावर रोगाची लक्षणे आढळल्यानंतर, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने स्टीकर वापरून २ ते ३ फवारण्या कराव्यात.

 ०२०२६०९०२२६८

- डाॅ. गणेश काेटगिरे,

९९६०८३३३०१, ८७८८१५३३३२

(ऊसराेग शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Disease : ऊस पिकावर तांबेरा, करपा रोग

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Crop Insurance Scheme Reforms : जुन्या पीकविमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम

Agriculture Research : कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे देशातील १४२ कोटी लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य

Agriculture Scheme: शेततळ्यासाठी २ लाखांपर्यंत मिळणार अनुदान; शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना

SCROLL FOR NEXT