Crop Advisory Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : फळे, भाजीपाला पिकातील कीड, रोगाला कसा घालाल अटकाव?

बदलते हवामान, पावसाळी, ढगाळ वातावरणामुळे आंबा , केळी बागेत तसच भाजीपाला पिकामध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय या कीड रोगाच नियंत्रण कसं करायचं याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

Team Agrowon

Agriculture News : अलीकडेच झालेला मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीच प्रचंड नुकसान झालं. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा हापुस आंब्यालाही (Alphanso Mango) फटका बसलाय.

बदलते हवामान, पावसाळी, ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) आंबा , केळी बागेत तसच भाजीपाला पिकामध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय या कीड रोगाच नियंत्रण कसं करायचं याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

आंबा पिकावर नवीन फुटी वरील कीड, रोगांच्या नियंत्रणासाठी लॅम्डासायहॅलोथ्रीन (५ टक्के इसी) ६ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ मिली पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

केशर आंब्यामध्ये उभयलिंगी फुलांच प्रमाण, फुलधारणा आणि उत्पादन वाढविण्यासाठी एक टक्का पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून मोहर फुटण्याच्या वेळी आणि त्यानंतर एक महिन्याने एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गावठी व अनुउत्पादित आंब्याच्या झाडाचे सुधारित जातीत रूपांतर करण्यासाठी नवीन फुटव्यांवर मार्च महिन्यात केसर वाणाचे कलम करावे. 

केळी बागेत काकडी, भोपळा, कलिंगड, खरबूज तसेच मिरची, वांगी यासारखी पिके घेणं कटाक्षाने टाळावं.

झाडे पडू नयेत म्हणून वजनाने मोठ्या असलेल्या घडाला गरजेनुसार बांबूच्या किंवा पॉलीप्रोपेलींच्या पट्ट्यांच्या सहाय्याने आधार द्यावा.

केळी पिकावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी केळीचे घड ६ टक्के सच्छीद्रतेच्या पॉलिथिन पिशव्यांनी झाकावेत. 

सध्या कांदा पिकात ढगाळ वातावरण असल्यामुळे करपा रोगाचा प्रादुरर्भाव वाढू शकतो. तरी जांभळा व काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा  अॅनझोक्सिस्ट्रॉबीन १०  मिली किंवा टेब्यूकोनाझोल  १० मिली प्रति १०  लिटर व त्यासोबत  १० मिली स्टिकर घेऊन गरजेनुसार आठ ते दहा दिवसाच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात.  

फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा प्रोफेनोफॉस १० मिली अधिक १० मिली स्टीकर १० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आठ ते दहा दिवसाच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात. 

कोबी पिकावर मावा व फुलकोबीच्या गड्डा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करू नये. ढगाळ हवामानामुळे टिक्का रोग नियंत्रणासाठी मँकोझेब  २.५ ग्रॅम किंवा कार्न्बेंडाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT