Fruit Crop Orchard Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : फळबाग, भाजीपाला, चारापिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने फळबाग, भाजीपाला, चारा पिके आणि रेशीमशेतीसाठी कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.

Team Agrowon

हवामान अंदाजानुसार मराठवाडयात २० व २१ ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक २२ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने फळबाग (Orchard), भाजीपाला (Vegetables), चारा पिके (Fodder Crop) आणि रेशीमशेतीसाठी (Silk Farming) पुढील प्रमाणे कृषी सल्ल्याची (Crop Advisory) शिफारस केली आहे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन
संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत फळ गळ दिसून येत असल्यास एनएए ४ ते ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत ४०० ग्रॅम नत्र प्रति झाड याप्रमाणे वर खताची मात्रा द्यावी. डाळिंब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळिंब बागेत ३०० ग्रॅम नत्र प्रति झाड याप्रमाणे वर खताची मात्रा द्यावी. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू बागेत ६५० ग्रॅम नत्र प्रति झाड याप्रमाणे वर खताची मात्रा द्यावी.

भाजीपाला
मिरची, वांगी व भेंडी पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५ टक्के अधिक फेनप्रोपाथ्रीन १५ टक्के १० मीली किंवा डायमेथोएट ३० टक्के १३ मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके
चारा पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व ५ टक्के निंबोळी अर्काची पावसाची उघड बघून फवारणी करावी.

तुतीचे व्यवस्थापन कसे कराल?
यशस्वी कोष उत्पादन घेण्यासाठी तुती लागवडीनंतर दर दीड महिण्याला तुतीची छाटणी करावी. लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासुन पुढे १५ ते २० वर्षा पर्यंत उत्पादन मिळू शकते. पण तुतीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश या रासायनीक खताची मात्रा १४० किलो अमोनियम सल्फेट, १७० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १९ किलो म्यूरेट ऑफ पोटॅश प्रति एकरी याप्रमाणे द्यावे. याबरोबरच जुन व नोव्हेंबर महिण्यात ४ क्विंटल प्रमाणे एकूण ८ क्विंटल कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT