Methi Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Methi Lagwad : कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे मेथी पीक

Methi Vegetable Farming : मेथी ही भाजी अनेकांच्या आवडीची असते. त्यामुळे दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो. या कारणामुळे मेथीला वर्षभर चांगली मागणी असते.

Team Agrowon

Fenugreek Cultivation : मेथी (Methi) ही भाजी अनेकांच्या आवडीची असते. त्यामुळे दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो. या कारणामुळे मेथीला वर्षभर चांगली मागणी असते.

मेथी हे कमी कालावधीचे भाजीपाला पीक असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी मेथीची टप्प्या-टप्याने लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.

मेथीची लागवड प्रामुख्याने जून आणि फेब्रुवारी महिन्यात केली जाते. मेथी ची दोन प्रकारे लागवड करता येते. मुख्य पीक म्हणून आणि आंतरपीक (Intercropping) म्हणून. मुख्य पीक म्हणून लागवड करायची असल्यास तीन मिटर बाय दोन मीटर च्या सपाट वाफ्यामध्ये लागवड करतात.

दोन ओळींमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतर ठेवून मेथीचे बी फेकून लागवड करतात. तसेच आंतरपीक म्हणून मेथी पिकाची लागवड करायची असल्यास मुख्य पिकातील मोकळ्या जागेत असणाऱ्या वीस ते तीन सेंटीमीटर जागेत लागवड करतात.

बियाणांचे प्रमाण  

मेथीचे मुख्य पीक म्हणून एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस ते तीस किलो बियाणे लागते. आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ सोडावे. 

सुधारित जाती 

फुले कस्तुरी : फुले कस्तुरी हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केले आहे. हे वाण जास्त उत्पादनक्षम असून  जास्त फुटवे फुटतात. हे वाण मर आणि नागअळीला सहनशिल आहे.

या मेथीची उगवण लागवड केल्यावर सात ते आठ दिवसात होते.

कस्तुरी सिलेक्शन : कस्तुरी सिलेक्शन हे वाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संशोधित करण्यात आले आहे. हे वाण खायला चविष्ट असते.

या वाणाची रोपे लहान आणि नाजूक असल्याने या वाणाला बाजारात चांगली मागणी असते. या मेथीची उगवण लागवड केल्यावर तीन ते चार दिवसात होते. पुसा अर्ली बंचिंग, कसुरी या जातींपासूनही चांगले उत्पादन मिळते. 

मेथी पिकाला सुरुवातीला हेक्टरी २० किलो आणि नंतर खुरपणी झाल्यानंतर २० किलो नत्र द्यावे. यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. 

मेथी पीक जातीनूसार ४० ते ६० दिवसात तयार होते. उत्पादन हेक्टरी ७ ते ८ टनापर्यंत मिळते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT