Gerbera Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

जरबेरा लागवड कशी करावी ?

मागणी आणि मार्केटनूसार जरबेरा लागवडीचे नियोजन करावे.

Team Agrowon

सणसमारंभामध्ये जरबेरा (Gerbera) फुलांना भरपूर मागणी असते. याशिवाय लग्नसमारंभात सजावटीसाठी जरबेरा फुले वापरली जातात. मागणी आणि मार्केटनूसार जरबेरा लागवडीचे (Gerbera Cultivation)नियोजन करावे. जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी उतिसंवर्धित रोपांची लागवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या पिकाचे भरपूर उत्पन्न मिळते.

जमीन
५० ते ६० सेंमी खोलीची पाण्याचा निचरा होणारी सामू ५.५ ते ६.५ असलेली जमीन निवडावी.

पूर्व मशागत
लाल माती, शेणखत, वाळू २:१:१ या प्रमाणात मिसळून ७५ सेंमी रुंदीचे ३० ते ४५ सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. गादीवाफे ३ टक्के फॉरमॅल्डिहाइड या द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावेत.
सुधारित वाण
दाना एलन, सालवाडोर, पिंक एलॅगन्स यासारख्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी.

लागवडीची वेळ
जुलै ते ऑगस्ट दरम्यान ३० बाय ३० सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी.

खत मात्रा
५ ते १० किलो शेणखत, २० ग्रॅम नत्र, २० ग्रॅम स्फुरद आणि २० ग्रॅम पालाश प्रति चौरस मीटर लागवडीच्या वेळी द्यावे. लागवडीनंतर पहिले तीन महिने १० ग्रॅम नत्र, १५ ग्रॅम स्फुरद आणि २० ग्रॅम पालाश प्रती चौरस मीटर महिन्याला द्यावे. त्यानंतर चौथ्या महिन्यापासून १५ ग्रॅम नत्र, १० ग्रॅम स्फुरद आणि ३० ग्रॅम पालाश प्रती चौरस मीटर महिना द्यावे

आंतरमशागत ः वेळोवेळी वाळलेली रोगट पाने काढावीत. गादीवाफे खुरपून भुसभुशीत ठेवावेत.

पाणी व्यवस्थापण
ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या वाढीनुसार ७०० मिली पाणी प्रति झाड प्रतिदिन द्यावे. सदर पिकासाठी कीटकनाशके व बुरशीनाशके लेबल फ्लेम नाहीत.

काढणी व उत्पादन
लागवडीनंतर तीन महिन्यांनी फुले काढणीस येऊन तीन ते चार वर्षे पॉलिहाऊस मध्ये काढणी चालू राहते. २०० ते २५० फुले प्रति चौरस मीटर प्रति वर्ष मिळतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT