Cotton Bollworm
Cotton Bollworm Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Pink Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कपाशी फरदड टाळावी

टीम ॲग्रोवन

डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. योगेश मात्रे

मागील दोन आठवड्यांपासून क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत (Cropsap Project) परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी; नांदेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार; हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा; बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई, परळी, केज; जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी, जाफराबाद, बदनापूर, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण इ. तालुक्यातील प्रक्षेत्र भेटीमध्ये कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा (Cotton Pink Bollworm Outbreak) प्रादुर्भाव ४ ते ५ टक्क्यांदरम्यान आढळून आला. हा प्रादुर्भाव पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड (Kapus Fardad) घेणे टाळावे.

कपाशी वेचणीनंतर रब्बीपश्‍चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी मशागत, पेरणी आणि बियाणे अशा बाबींवरील खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामधील पिकापासून उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. त्यातच या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील बऱ्याच भागात विहिरी, कूपनलिका व कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे.

त्यामुळे कपाशीचे पीक काढण्याऐवजी पाणी व खतांच्या मात्रा देऊन कपाशीचा पूर्णबहर (फरदड) घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. फरदड घेण्याच्या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरही राहते. मात्र या पद्धतीमुळे शेतामध्ये पीक दीर्घकाळ राहिल्याने गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रमात खंड पाडण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे गरजेचे आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये.

वेळेवर कपाशीची वेचणी करून डिसेंबरनंतर शेतामध्ये कपाशी पीक ठेवू नये.

हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात.

हंगाम संपल्यावर ताबडतोब पऱ्हाटीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. शेत परिसरात पऱ्हाटी रचून ठेवू नयेत. त्यातील बोंड अळीच्या सुप्तावस्था असू शकतात.

रोटाव्हेटरऐवजी श्रेडर यंत्राने बारीक चुरा करून त्यापासून कंपोस्ट खत करावे.

जिनिंग मिल व कापूस साठवण अशा ठिकाणी कामगंध सापळे वापरावेत.

 ०२४५२-२२८२३५

(कीटकशास्त्र विभाग,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT