silk Farming
silk Farming Agrowon
ॲग्रो गाईड

शेतकरी नियोजन : रेशीम शेती

माणिक रासवे

शेतकरी : अनिल मारुती सोलव
गाव : बरबडी (ता. पूर्णा, जि. परभणी)
एकूण क्षेत्र : २२ एकर
तुती लागवड : ४ एकर

आमच्या एकत्रित कुटुंबाची २२ एकर शेती (Farm) आहे. त्यात ४ एकरांवर तुती लागवड आहे. सन २००९ मध्ये रेशीम व्यवसायास सुरू केल्यानंतर पहिली ४ वर्षे रेशीम कोष उत्पादनावर (silkworm production) भर दिला. त्यातून या व्यवसायातील बारकावे समजले. सुरुवातीच्या काळात १०० अंडीपुंजांपासून ७० ते ७५ किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन (silkworm production) मिळायचे. उत्पादित कोषाची बंगळूर जवळील रामनगरम येथील बाजारपेठेत विक्री होते.
- गेल्या काही वर्षांत परभणी तसेच शेजारील हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. चॉकी (बाल्यकीटक)द्वारे दर्जेदार कोष उत्पादन मिळत असल्यामुळे चॉकीची मागणी वाढली. परंतु आमच्या भागात चॉकी सेंटर नव्हते. जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय तसेच केंद्रीय रेशीम मंडळाच्या परभणी येथील कार्यालयातून बाल्य रेशीम कीटक (चॉकी रेअरिंग सेंटर) संगोपन व्यवसायाबाबत माहिती घेतली. त्यानंतर सन २०१३ मध्ये रेशीम कोष उत्पादन कमी करून मिनी चॉकी रेअरिंग सेंटर सुरू केले. चॉकीची मागणी वाढत होती. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढविण्याचे ठरविले.

- कुटुंबातील सर्व सदस्य रेशीम शेतीतील (silkworm Farming) विविध कामांमध्ये मदत करतात. बंधू श्रीधर सोलव यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथील संस्थेत चॉकी सेंटर व्यवस्थापनावरील प्रशिक्षण पूर्ण घेतले. त्यानंतर २०१८ मध्ये मॉडेल चॉकी सेंटर सुरू केले. त्यासाठी शेतामध्ये सिमेंट विटांचे बांधकाम, छत असलेले पक्के संगोपनगृह तयार केले.
- आमच्या चॉकी रेअरिंग सेंटरची क्षमता एकावेळी साडेआठ हजार अंडीपुंज उबविण्याची आहे. परभणी, नांदेड, लातूर, बीड तसेच हिंगोली तसेच शेजारील तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांकडून रेशीम कोष उत्पादकांना चॉकीचा (बाल्य अवस्थेतील कीटकांचा) मोठी मागणी आहे. या शेतकऱ्यांकडून १५ दिवस आधी आगामी मागणी घेतली जाते.
- अंडीपुंजाच्या हॅचिंग झाल्यानंतर दोन मोल्ट अवस्थेतील बाल्य रेशीम कीटकांचे १० दिवसांचा कालावधी लागतो. बाल्यावस्थेत संगोपन करताना खूप काळजी घ्यावी लागते. या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण बॅच बाद होण्याचा धोका असतो. रोगमुक्त, गुणवत्तायुक्त चॉकी उत्पादन हीच दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाची पहिली पायरी आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाते.
- दुसऱ्या अवस्थेतील मोल्टनंतर १२ तासांच्या आत संबंधित शेतकऱ्यांपर्यंत (Farmer) चॉकी पोहोच करावी लागते.
- सध्या चॉकीचे दर बावीसशे रुपये प्रतिशेकडा आहेत. तसेच शंभर रुपये वाहतूक भाडे घेतले जाते. एका दिवसामध्येच सर्व चॉकी पोहोचविली जाते. त्यानंतर पुढील बॅचचे नियोजन सुरू होते. सध्या मागणी कमी असल्यामुळे चॉकी उत्पादन बंद आहे. जून महिन्यात पूर्ववत चॉकी सेंटर सुरू होईल.

तुती बागेचे व्यवस्थापन :
तुती बागेत वर्षांतून दोन वेळा एकरी दोन ट्रॉली शेणखत दिले जाते. पहिला मात्रा मे महिन्याच्या शेवटी तर दुसरी मात्रा सप्टेंबर महिन्यात दिली जाते. चॉकी पोहोचविल्यानंतर तुती बागेतील कामांवर भर दिला जातो. खुरपणी करून बाग स्वच्छ केली जाते. त्यानंतर गरजेनुसार पाणी दिले जाते.

संगोपनगृह निर्जंतुकीकरण :
- रेशीम कोष उत्पादनासाठी ३० फूट बाय २० फूट आकाराचे संगोपनगृहाची उभारणी केली आहे.
- चॉकीसाठी ३० बाय २० फूट आकाराचे सिमेंट, विटा, छत असलेले पक्के संगोपनगृह आहे.
- कोष काढणी आणि चॉकी गेल्यानंतर फॉर्मेलिन, ब्लिचिंग पावडर तसेच अन्य शिफारशीत घटकांद्वारे संगोपनगृह आणि ट्रेचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर साध्या पाण्याने धुऊन घेतले जाते.

मागील महिनाभरातील कामकाज :
- ३ एप्रिलला १०० अंडीपुंजांच्या बॅचची कोष काढणी केली. त्यापासून साधारण ६९ किलो कोष उत्पादन मिळाले.

- उत्पादित कोषांची बंगलोर जवळील रामनगरम येथील मार्केटमध्ये विक्री केली. त्यास ६११ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला.
- कोष काढणीनंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले.
- कीटक संगोपनासाठी आवश्यक तापमान राखण्यासाठी निवाऱ्याच्या चारही बाजूने गोणपाट लावले. त्यावर ठिंबक सिंचनाद्वारे पाणी सोडले जाते.

आगामी कामांचे नियोजन :
- रेशीम कोष उत्पादनासाठी नांदेड जिल्ह्यातील धनगरवाडी येथून १५० अंडीपुंज (चॉकी) येथून मागणी केलेली आहे. अंडीपुंज उपलब्ध झाल्यानंतर पुढील बॅच शुक्रवारी (ता.२२) पासून सुरू होईल. हे कोष साधारण २० दिवसांत तयार होतील.
- जून महिन्यात अजून तीन एकरांवर तुती लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोपांची मागणी केली आहे.

- अनिल सोलव : ९९२३३८३०१७
(शब्दांकन : माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT