Tomato Processing  Agrowon
ॲग्रो गाईड

Tomato Processing : टोमॅटो मुल्यवर्धनातून मिळवा अधिकचा नफा

टोमॅटो अत्यंत नाशवंत असून, लगेच खराब होतात. टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करता येते.

Team Agrowon

सध्या टोमॅटोचे (Tomato) भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना माल अत्यल्प किमतीत काडीमोल भावात विकावा लागतो आहे. टोमॅटो अत्यंत नाशवंत असून, लगेच खराब होतात. टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करता येते.  साठवणुकी संदर्भातील अज्ञान, प्रक्रियेविषयी अनभिज्ञता, पुरेशा साधनसामग्रीचा आभाव, तांत्रिक ज्ञानाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे प्रक्रिया करण्याला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेत. टोमॅटोपासून रस, केचप, सॉस असे पदार्थ तर तयार करता येतात. टोमॅटो सॉस, केचप तर शहरी भागात लोकप्रिय असून लोणचे, ज्यूस, सूप, पावडर या पदार्थांनाही बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे नुकसान टाळून अधिकचा फायदा मिळवता येतो. टोमॅटो पासून पावडर, केचप कसे बनवायचे याविषय़ी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

टमाटो पावडर

टोमॅटो पावडर विविध भाज्यांच्या ग्रेव्ही मध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे. हॉटेल व्यावसायीकांकडून तसेच विविध प्रक्रिया उद्योगामध्ये टोमॅटो पावडरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. 

टोमॅटो स्वच्छ धुऊन उकळत्या पाण्यात २-३ मिनिटे उकळवून घ्यावे आणि त्वरित गार पाणी ओतावे.

या टोमॅटोचे काप करून ट्रे ड्रायरमध्ये ठेवून ६० अंश सेल्सिअस तापमानाला १४ तासांपर्यंत वाळवावे.

-  ढवळत असताना त्यात एका कपड्यात मसाल्यांची पावडर बांधून ती पुरचुंडी उकळत्या टोमॅटोच्या पल्पमध्ये धरून ठेवावी आणि सोबतच कांदा आणि लसूण पावडर एकत्र करावी.

१८ अंश ब्रिक्स इतका टी.एस.एस. आल्यावर उरलेली, १०० ग्रॅम साखर, सायट्रिक ॲसिड मिसळून पुन्हा उकळावे आणि शेवटी व्हिनेगर एकत्रित करावे.

या केचपचा ब्रिक्स कमीत कमी २५ इतका आल्यावर गॅस बंद करून गरम असतानाच केचपचे पॅकिंग करावे.

214 words / 1455 characters

वाळवलेल्या टोमॅटोची पावडर करून गाळून घ्यावी आणि हवाबंद पॅकिंग करून साठवावी.

टोमॅटो केचप  : १ किलो टोमॅटो, व्हिनेगर ः ४० मिली, लवंग, दालचिनी, काळीमिरी, जायफळ, जायपत्री ः ६० ग्रॅम कांदा आणि लसूण पावडर ः १० ग्रॅम सायट्रिक ऍसिड ः ५ ग्रॅम, साखर ः १५० ग्रॅम, पेक्टिन ः ५ ग्रॅम 

- उकळत्या पाण्यात टोमॅटो २-३ मिनिटे उकळून त्यावर लगेच गार पाणी ओतावे. या टोमॅटोचा पल्प तयार करावा.

- १ किलो टोमॅटोचा पल्प कढईत घेऊन सतत ढवळत ठेवून उकळवा, सुमारे एक तृतीयांश भाग कमी झाल्यावर त्यात ५० ग्रॅम साखर मिसळून पुन्हा ढवळून उकळावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT