Brinjal Crop Protection Agrowon
ॲग्रो गाईड

Vegetable Crop : थंडी, ढगाळ वातावरण भाजीपाला पिकासाठी हानीकारक

किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकास हलके पाणी द्यावे. थंडीपासून संरक्षणासाठी भाजीपाला पिकांना रात्रीच्या वेळी सिंचन करणे फायद्याचे ठरते. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

Team Agrowon

हवामान अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील ४ ते ५ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता आहे.

६ ते १२ जानेवारी दरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर दिनांक १३ ते १९ जानेवारी दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकास (Vegetable crop) हलके पाणी द्यावे. थंडीपासून संरक्षणासाठी भाजीपाला पिकांना रात्रीच्या वेळी सिंचन करणे फायद्याचे ठरते. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकात कीड, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सांगीतलेल्या उपाययोजना पाहुया. 

सध्याच्या ढगाळ व  धुक्याच्या वातावरणामूळे मिरची, वांगी व भेंडी पिकात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

या किडींच्या व्यस्थापनासाठी लिकॅनीसिलीयम लिकॅनी या जैविक बुरशीनाशकाची ४० मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन (५ %) + फेनप्रोपाथ्रीन (१५ %) १० मीली किंवा डायमेथोएट (३० %) १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

टोमॅटो पिकावरील करपा रोगाच्या  व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन (१८.२ %) + डायफेनकोनॅझोल (११.४ % एससी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

सध्याच्या ढगाळ व  धुक्याच्या वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन (२३ % एससी) २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharashiv Farmer Story: सरकारच्या ५ हजारांच्या अग्रिम मदतीवरुन नाराजी, शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची 'पट्टी'च केली मनी ऑर्डर

Integrated Farming: एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल : कुलगुरू खर्चे

Agriculture Irrigation Challenges: मोटारपंप बंदीच्या निर्देशांमुळे नवे संकट : किशोर वडेट्टीवार

Farmers Issue: कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा : खासदार अमर काळे

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

SCROLL FOR NEXT