Chandrkant Patil Shaifek  Agrowon
ॲग्रो गाईड

Chandrkant Patil: चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; शाईफेक करणाऱ्याला अटक

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या पिंपरी येथे शनिवारी (ता. १०) संध्याकाळी शाई फेक करण्यात आली.

Team Agrowon

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या पिंपरी येथे शनिवारी (ता. १०) संध्याकाळी शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल शुक्रवारी (ता.९) वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे अनेकांनी पाटील यांच्या विधानाचा निषेध केला. त्यानंतर सकाळी पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पुण्यात आंदोलन केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणाबाजी केली होती. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

थोर महापुरुषांबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ त्यांच्याच कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील हाय हाय च्या घोषणाही देण्यात आल्या.

चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चौक पोलीस बंदोबस्त होता. मात्र काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केली आहे. चंद्रकांत पाटील हे आज चिंचवड गावात मोरया गोसावी महोत्सवासाठी हजर राहिले. याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला झाला. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक हल्ला झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.

"मी घाबरत नाही. पोलिस पसंरक्षण काढतो या पुढे. मी कुणाला घाबरत नाही. शब्दाला शब्दानं उत्तर देता येते. सरंजामशाहीला माझं पिंपरीत येणं रुचलं नाही. माझं वाक्य इलेक्ट्रॉनिक मीडियाने मोडतोड करून दाखवलं. मी हरणारा माणूस नाही." असं चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीवर प्रतिक्रिया दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : मनोज जरांगे

Sangli APMC Trifurcation: सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव सादर

Gram Panchayat Administrator: कृषी अधिकाऱ्यांचीही ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती होणार

Pomegranate Farming: डाळिंबासाठी स्थानिक सूक्ष्मजीवांचा वापर प्रभावी

MSRTC Women Concession: एसटीमध्ये ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणी पावतीवरही सवलत

SCROLL FOR NEXT