Harbhara Ghate Ali  Agrowon
ॲग्रो गाईड

Harbhara Ghate Ali : हरभऱ्यावरील घाटे अळीसाठी काय उपाय करावा?

सध्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. फुलोरा अवस्थेतील पिकाचे नुकसान होत आहे. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था तसेच प्रथम अवस्थेतील असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते.

Team Agrowon

सध्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे (Chana Crop Pod Borer Management) अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

फुलोरा अवस्थेतील पिकाचे नुकसान होत आहे. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था तसेच प्रथम अवस्थेतील असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते. 

यंदा बहुतांश भागात हरभरा पेरणीस उशीर झाला आहे. काही ठिकाणी हरभऱ्याचे पीक कळ्या, फुले लागण्याच्या अवस्थेत आहे.

तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पीक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

घाटे अळीच्या नियंत्रणासाठी वेळेवर उपाययोजना कराव्यात, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. 

सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी Tआकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. 

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ % इसी) २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ %) ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची २०० ग्रॅम १० लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. 

सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० %) १३ मिली किंवा अॅसिफेट (७५ %) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT