गुणकारी अन् औषधी हरभरा 
ॲग्रो गाईड

गुणकारी अन् औषधी हरभरा

हरभरा पौष्टिक असल्याने अशक्तपणामध्ये जरूर खावा. कोवळे हरभरे भाजून खावेत.

डॉ. विनिता कुलकर्णी

साधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे घाटे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. त्यापासून विविध पदार्थदेखील रुचकर होतात. त्यामुळे गृहिणींमध्ये हरभरा विशेष प्रिय असतो. त्याचे पीठ, फुटाणे असे विविध पदार्थ तयार करता येतात. असा हा हरभरा औषध म्हणूनही उत्तम काम करतो.  हरभऱ्याची आंब पचनावर उत्तम कार्य करते. अजीर्ण, अपचन, गॅसेससाठी उपयोगी असते. 

  • हरभरा पौष्टिक असल्याने अशक्तपणामध्ये जरूर खावा. कोवळे हरभरे भाजून खावेत.
  • हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, साय, दूध, हळद, मध हे मिश्रण चेहऱ्याला लेप स्वरूपात लावून वाळले की काढून टाकावे. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो. 
  • त्वचेच्या खाजेसाठी साबण बंद करून अंघोळीच्या वेळी हरभऱ्याचे पीठ दुधात कालवून लावावे. 
  • बऱ्याचदा सर्दी वारंवार होणे, घशामध्ये कफाचा चिकटा असणे, घसा खाकरावा लागणे अशा तक्रारी असतात. अशा वेळी फुटाणे पाच-सहा प्रमाणात दोन-तीन वेळा सेवन करावेत. पण त्यावर पाणी पिऊ नये. 
  • रात्री कफाचा खोकला असल्यास फुटाणे सेवन करून झोपल्यास कफ कमी होतो. घसा मोकळा होतो. अर्थातच कफ कमी करण्यासाठी औषधे जोडीला हवीतच. 
  • हरभरे भिजत घालून त्याला मोड आणून सेवन केल्यास शक्तिवर्धक म्हणून काम करतात. 
  • सर्दी खूप झाल्यास, नाक सारखे वाहत असल्यास रोज फुटाणे सेवन करावेत. त्याचा फायदा होतो. 
  • हरभरा औषधी असला तरी पचायला जड असतो. विशेषतः पीठ, भिजवलेली डाळ या गोष्टींनी पोट जड होते. म्हणून पचनशक्ती उत्तम असणाऱ्या लोकांनी हरभरा सेवन केल्यास शक्तिवर्धक म्हणून काम होते. हे महत्त्वाचे जरूर लक्षात ठेवावे. 
  • पथ्य 

  • जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात. 
  • जेवताना पाणी गरम प्यावे. 
  • शिळे, तेलकट, कमी शिजलेले, मांसाहार वर्ज्य करावा. मांसाहार पचवण्याची शक्ती असेल, तर १५-२० दिवसांतून एकदा करावा. हरभरा पौष्टिक असला तरी पचनशक्ती उत्तम राहावी म्हणून हे पथ्य पाळावे. 
  • काळजी
  • वारंवार कफ, सर्दी, खोकला असल्यास एक्‍स-रे, रक्ततपासणी, आवश्‍यक तपासण्या जरूर कराव्यात. 
  • नेहमीच्या औषधांच्या जोडीला पूरक म्हणून फुटाण्यांचा औषध म्हणून उपयोग करावा. अशा प्रकारे पदार्थात वापरला जाणारा हरभरा विविध रूपांत औषध म्हणून कार्य करतो.
  •  : डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    पुणे

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

    Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

    Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

    Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

    Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

    SCROLL FOR NEXT