फुल शेती  
ॲग्रो गाईड

फूलशेती सल्ला

डॉ. सतीश जाधव, डॉ. देविदास काकडे

गुलाब : 

  • खुल्या शेतातील गुलाब पिकाची छाटणी करावी. छाटणी करताना जुन्या, किडक्‍या एकमेकांत गुंतलेल्या, आडव्या-तिडव्या किंवा वाकड्या, रोगट फांद्या; तसेच वाळलेल्या फांद्या धारदार सिकेटरच्या साहाय्याने कापून टाकाव्यात. झाडाला योग्य आकार मिळेल अशी छाटणी करावी. त्यासाठी लांब धुमारे अर्धेअधिक कापावेत.
  • झाडाला आकार देताना पिकातील आंतरमशागतीची कामे सुलभ होईल अशा पद्धतीने छाटणी करावी. छाटलेल्या भागावर ताबडतोब १० टक्के बोर्डोपेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी. 
  • छाटणीनंतर हेक्‍टरी १५ टन शेणखत व ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. खते देताना आळे किंवा चर पद्धतीने द्यावीत. खत दिल्यानंतर पाणी द्यावे.
  • ॲस्टर :

  • लागवडीसाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. त्यासाठी १x१ मीटर आकाराचा गादीवाफा तयार करावा. गादीवाफ्याची उंची १५-२० सें.मी. ठेवावी. बियांची पेरणी वाफ्यावर ओळीत करावी. शक्‍यतो जमिनीत १-१.५ सें.मी. खोल बी पेरावे. दोन ओळींतील अंतर १०-१५ सें.मी ठेवून वाफ्यावर बी पातळ पेरावे.
  • लागवडीसाठी १५-२० सें.मी. उंच वाढलेली अथवा ५-७ पाने असलेली रोपे निवडावीत. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर  पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.लागवड सरी वरंब्यावर ३०x३० सें.मी. किंवा ३०x४५ सें.मी. अंतरावर करावी.
  • ग्लॅडिओलस : 

  • ग्लॅडिओलसची लागवड उशिरात उशिरा १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. मोठ्या प्रमाणावर लागवड करावयाची झाल्यास १०-१५ दिवसांच्या अंतराने करावी.
  • लागवडीसाठी निरोगी, मोठे कंद निवडावेत. लागवड करताना दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. व दोन कंदांतील अंतर १०-१५ सें.मी. ठेवावे.
  • लागवडीपूर्वी कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणात १० मिनिटे बुडवून लागवड करावी. त्यामुळे पिकाचे मर रोगापासून संरक्षण होते.
  • संपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वयित पुष्प संशोधन  प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

    Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

    First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

    Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

    Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

    SCROLL FOR NEXT