उसावरील तपकिरी ठिपके रोग
उसावरील तपकिरी ठिपके रोग  
ॲग्रो गाईड

उसावरील तपकिरी ठिपके रोगाचे नियंत्रण

डॉ. सी. डी. देवकर

रोगकारक बुरशी : सरकोस्पोरा लॉजिपस  लक्षणे : 

  • सुरवातीला जुन्या पानांच्या दोन्ही बाजूवर अंडाकृती आकाराचे लालसर ते तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वलय दिसते. 
  • ठिपक्याचा मध्यभाग वाळून, सुकून करड्या रंगाचा, सभोवती लाल कडा, त्याला लागूनच पिवळे वलय असे एकमेकांत मिसळलेले असंख्य ठिपके दिसतात. 
  • पानांवरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे ठिपके तयार होतात. अशा ठिपक्यांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्‍लेषण होत नाही. त्यामुळे उसाच्या उत्पादनावर आणि साखर उताऱ्यावर अनिष्ट परिणाम होतो. 
  • प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. 
  • नियंत्रणाचे उपाय : (प्रति लिटर पाणी) 

  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा 
  • कॉपर ऑक्झीक्लोराईड ३ ग्रॅम 
  • १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्टंट मिसळावा. 
  • संपर्क : डॉ. सी. डी. देवकर- ९४२०००८२९१  (प्रमुख, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    SCROLL FOR NEXT