Various vegetable crops should be planted in the backyard 
ॲग्रो गाईड

पोषण बाग असावी दारी

आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी जागेच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याची परसबाग असावी; जेणेकरून भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही.

माधुरी रेवणवार

आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी जागेच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याची परसबाग असावी; जेणेकरून भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही. निरोगी जीवनासाठी भाजीपाल्याची गरज आहे. भाजीपाल्यांमधून सर्वप्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे उपलब्ध होतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. परसबागेचे फायदे 

  • घरच्या घरी ताज्या, पौष्टिक भाजीपाल्याची उपलब्धता.
  • सेंद्रिय भाजीपाला रोजच्या आहारासाठी मिळतो, खर्च कमी होतो. 
  • नियमित सकस भाजीपाला खाल्ल्यामुळे रक्तक्षय व पोषकतत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार कमी होतात. 
  • घराभोवतीचा परिसर छान दिसतो.
  • परसबागेतील लागवडीचे नियोजन खरीप हंगाम (जून ते ऑक्टोबर)  वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार, चवळी, दोडका, कारली, काकडी, दुधी भोपळा, मुळा, पालक, राजगिरा, मेथी, कोथिंबीर, शेपू. रब्बी हंगाम (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)  टोमॅटो, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, वांगे, मिरची, फ्लॉवर, कोबी, मुळा, गाजर, बीट, कांदा, लसूण, बटाटा, दोडका, कारली, दुधीभोपळा. उन्हाळी हंगाम (मार्च ते जून) भेंडी, चवळी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, घेवडा, भोपळा, कारली, दोडका, काकडी, राजगिरा, पालक. भाजीपाल्याची दैनंदिन गरज (प्रतिव्यक्ती, प्रतिग्रॅममध्ये)

    भाजी पुरुष स्त्री   लहान मुले
       बैठे काम करणारा  मध्यम मेहनत करणारा जास्त मेहनत करणारा बैठे काम करणारी मध्यम मेहनत करणारी जास्त मेहनत करणारी १-३ वर्षे ४-६ वर्षे

    १०-१२ वर्षे (मुले) 

    १०-१२ वर्षे (मुली)
    पालेभाज्या ४० ४० ४० १०० १०० १०० ४० ५० ५० ५०
    इतर भाज्या ५० ६० ८० ५० ५० ६० १० २० ३० ३०
    कंदमुळे ६० ७० ८०  ४०  ४० १०० २० ३० ५० ५०

    संपर्क- माधुरी रेवणवार, ८९९९५६०६८२ (गृहविज्ञानतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

    Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

    Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

    Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

    Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

    SCROLL FOR NEXT