बिटापासून बर्फीनिर्मिती  
ॲग्रो गाईड

बिटापासून बर्फीनिर्मिती

सोमनाथ सावळकर, डॉ. प्रदीप थोरात

लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे लोह, जीवनसत्त्वे, फोलिक आम्ल आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. बिटामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. यातील अँटिआॅक्सिडंटमुळे (विशेषतः बिटा गीयानीन) शरीरात अनेक रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता तयार होते. याचबरोबर नायट्रेट, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडीअम, जीवनसत्त्व ब १ (थायमिन), ब २ (रायबोफ्लेवीन) आणि क (एस्कॉर्बिक आम्ल) हे तत्त्व बिटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.  बद्धकोष्टता आणि त्वचेच्या समस्येवर बीट उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाबदेखील नियंत्रित ठेवते तसेच रक्त शुद्धीकरण करते. बिटाचे उपयोग लक्षात घेता यापासून खाद्यपदार्थ निर्मितीला चांगली संधी आहे.

बीटरूट बर्फी सामग्री (प्रती १०० ग्रॅ.)

साखर ४० ग्रॅ.
खिसलेले खोबरे ३० ग्रॅ.
बीटरूट २५ ग्रॅ.
दूध ५ मि.लि.

बर्फी तयार करण्याची पद्धत ः 

  •    बीटरूट स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढून घ्यावी आणि खिसून घ्यावे. 
  •    खिसलेले बीट, खोबरे, साखर यांचे दुधासोबत मिश्रण तयार करावे.
  •    मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी गॅसवर गरम करावे. दुसऱ्या बाजूला ट्रेमध्ये तुपाचे लेप लावून त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे जाड थर तयार करून घ्यावा. तयार झालेला थर थंड करून योग्य आकारात कापून घ्यावे. तयार झालेली बर्फी हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.
  •  : सोमनाथ सावळकर, ७३५०३८५००१ (अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, लोदगा, जि. लातूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

    Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी ३४३.९९ कोटींची मान्यता

    Dark Sky Destination : उधमाळ येथे होणार ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’

    Cable Thieves Arrested : शेतकऱ्यांच्या मोटारीचे केबल चोरणारे जेरबंद

    Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेतून परताव्यांबाबत संभ्रम

    SCROLL FOR NEXT