sweet potato varieties 
ॲग्रो गाईड

रताळे लागवडीसाठी सुधारित जाती

रताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे पीक आहे. रताळ्याची बाजारपेठेतील वाढती मागणी पाहता सुधारित पद्धतीने लागवड आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची निवड महत्त्वाची आहे.

डॉ. संकेत मोरे, डॉ. नम्रता गिरी

रताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे पीक आहे. रताळ्याची बाजारपेठेतील वाढती मागणी पाहता सुधारित पद्धतीने लागवड आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची निवड महत्त्वाची आहे. रताळे पिकाची लागवड साधारणपणे मे ते जुलै या कालावधीमध्ये केली जाते. जेथे पाण्याची चांगली उपलब्धता आहे तेथे ऑक्टोबर- नोव्हेंबर आणि उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. लागवडीसाठी कंद किंवा वेल यांचा वापर केला जातो. प्राथमिक व दुय्यम रोपवाटिकेमध्ये कंदाचा लागवडीसाठी उपयोग करावा. प्राथमिक रोपवाटिका

  • लागवडीच्या तीन महिन्याच्यांअगोदर प्राथमिक रोपवाटिकेची तयारी करावी. एक हेक्‍टरवर लागवडीसाठी १०० वर्गमीटर एवढी जागा लागते.
  • लागवडीसाठी १०० ते १५० ग्रॅम वजनाचे निरोगी कंद निवडावेत. लागवड ६० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर करावी.
  • लागवडीच्यावेळी रोपवाटिकेत १.५ कि.ग्रॅ. युरिया मिसळावा. गरजेनुसार पाणी द्यावे.
  • दुय्यम रोपवाटिकेसाठी ४५ दिवसांच्या लागवडीनंतर वेलाचे २० ते ३० सें.मी. तुकडे घ्यावेत. लागवडीसाठी फक्त वेलाच्या शेंडाचे तुकडे घ्यावेत.
  • दुय्यम रोपवाटिका

  • या रोपवाटिकेमध्ये तुकड्यांची ६०x३० सें.मी.अंतरावर लागवड करावी. १५ व ३० दिवसानंतर रोपवाटिकेत ५ किलो युरियाचा मात्रा द्यावी.
  • लागवडीच्या ३० ते ४५ दिवसांनंतर शेंडा व वेलींच्या मधल्या भागातून २०-३० सें.मी. लांब वेल कापावेत. दुय्यम नर्सरीसाठी ५०० मीटर वर्ग इतकी जागा लागते.
  • जर लागवड कंदापासून न करता वेलीतून केली तर प्राथमिक रोपवाटिका वगळून दुय्यम रोपवाटिकेचा वापर करावा.
  • वेलींची निवड लागवडीकरिता शेंड्यांचा भाग निवडावा. वेल मोठी असल्यास शेंडा व मधल्या भागातून वेल निवडावी. शक्यतो २० ते ३० सें.मी. लांबीचे वेल निवडावेत. लागवडीपूर्वी कापलेल्या वेलांचे बंडल बांधून सावलीच्या ठिकाणी २ दिवसांपर्यंत ठेवता येते. लागवड

  • लागवडीपूर्वी जमीन भुसभुशीत करून घ्यावी. त्यामुळे कंदांची चांगली वाढ होते.
  • लागवडीचे अंतर ६० बाय ३० सें.मी. सें.मी. ठेवावे.
  • लागवड करताना वेल सरळ लावावी. साधारणपणे २ ते ३ कोंब जमिनीच्या आत लावून वरून माती टाकावी. शक्यतो वेलीचे २ ते ३ कोंब जमिनीवर असावेत.
  • खत व्यवस्थापन  लागवडीपूर्वी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. या पिकाला हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश लागते. लागवडीच्यावेळी अर्धा किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. रासायनिक खतांची मात्रा माती परिक्षणानुसारच द्यावी. पीक व्यवस्थापन  पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पहिल्या टप्प्यात तण नियंत्रण करावे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. संपर्क - डॉ. संकेत मोरे, ९६०१२६६६३६ ( केंद्रीय कंद पिके संशोधन संस्था, त्रिवेंद्रम, केरळ)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

    Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

    Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

    Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

    Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

    SCROLL FOR NEXT