cultivation of Different vegetables in ten gunthas plots 
ॲग्रो गाईड

प्रत्येकी १० गुंठ्यात पिकवा विविध भाजीपाला

भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी भाजीपाला लागवड पध्दतीत काही प्रमाणात बदल करणे शक्य होईल. एक एकरात किंवा दोन-चार एकरांत एखादेच पीक घेण्याच्या ऐवजी क्षेत्र निश्‍चित करून त्यात चार ते पाच पिकांची विविधता ठेवता येईल. त्यातून त्यांची विक्री पध्दती सुकरपणे करणे शक्य होईल.

राहुल घाडगे

भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी भाजीपाला लागवड पध्दतीत काही प्रमाणात बदल करणे शक्य होईल. एक एकरात किंवा दोन-चार एकरांत एखादेच पीक घेण्याच्या ऐवजी क्षेत्र निश्‍चित करून त्यात चार ते पाच पिकांची विविधता ठेवता येईल. त्यातून त्यांची विक्री पध्दती सुकरपणे करणे शक्य होईल.​

कोरोना लॉकडाऊनमुळे जगावर सध्या अन्नअरिष्टाचे संकट उभारले आहे. त्याबाबतचा इशारा संयुक्तराष्ट्रसंघाने नुकताच दिला आहे. अर्थात महामारीच्या संकटात आपल्याकडे पुरेसे अन्नधान्य उपलब्ध आहे. ग्राहकांकडून मागणीही चांगली आहे. मात्र विक्रीचा मोठा प्रश्न समोर उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अर्थात ग्राहकांची मागणी काही किलोमध्ये असते. पण शेतातील माल टनात असतो. कोरोनाचे संकट कधी संपेल ते माहित नाही. कदाचीत या सारख्या अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावेच लागणार आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, बाजारभावाची अनिश्‍चितता अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी भाजीपाला लागवड पध्दतीत काही प्रमाणात बदल करणे शक्य होईल. एक एकरात किंवा दोन-चार एकरांत एखादेच पीक घेण्याच्या ऐवजी क्षेत्र निश्‍चित करून त्यात चार ते पाच पिकांची विविधता ठेवता येईल. त्यातून त्यांची विक्री पध्दती सुकरपणे करणे शक्य होईल.

अशी ठेवता येईल पीक पध्दती

  • एका एकरांत किंवा क्षेत्रात प्रत्येकी सुमारे १० गुंठ्याचे प्लॉट तयार करता येतील.
  • त्यामध्ये टोमॅटो, कारली, दुधी भोपळा, दोडका असे वेलवर्गीय प्रकार घेता येतील.
  • दुसऱ्या क्षेत्रात त्याच पद्धतीने कोबी, फ्लॉवर, बीट, गाजर, मिरची, वांगी, चवळी, घेवडा, वालवड, धणे, मेथी, शेपू, पालक अशी पिके घेता येतील.
  • ज्या शेतकऱ्यांकडे क्षेत्र जास्त असेल त्यांना या पद्धतीत आपल्या सोयीनुसार बदल करता येईल.
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सुनियोजनाद्वारे या पध्दतीने थोड्या थोड्या प्रमाणात ४ ते ६ महिने भाजीपाला मिळू शकतो. त्यातून विक्रीला ताण येणार नाही.
  • अशा मालाची थेट विक्री देखील करणे शक्य होईल. येथून पुढे ‘होम डिलिव्हरी’ साठी संधी प्राप्त झालेली असेल यात तीळमात्र शंका नाही. त्यादृष्टीने पीकपध्दतीची दिशा ठेववी लागेल.
  • प्रत्येकी दहा गुंठे पद्धतीमध्ये पिकवलेल्या मालाची विक्री वेगवेगळ्या माध्यमातून खालीलप्रमाणे होऊ शकते.

  • रिटेलमध्ये विक्री करणारे मॉंलधारक
  • छोटे व्यापारी
  • शेतात येणाऱ्या थेट ग्राहकाला
  • स्वत: बास्केट तयार करून पुणे- मुंबईसारख्या शहरात घरपोच सेवा यात शेतकरी गटाद्वारे संघटित होऊन विविध मालांचे उत्पादन व विक्री व्यवस्थेची जबाबदारी सांभाळू शकेल. खालील तक्ता लागवड कालावधी व माल विक्रीस उलब्ध होण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरेल.
  • पीक भाजी काढणीला सुरू होऊन संपण्याचा कालावधी
    धणे  ३० ते ४० दिवस
    मेथी ३० ते ४० दिवस
    शेपू ३० ते ४० दिवस
    करडई ३० ते ४० दिवस
    पालक ३० ते ४० दिवस
    टोमॅटो ६० ते १२० दिवसांपर्यंत
    चवळी ४५ ते १२० दिवसांपर्यंत
    घेवडा ४५ ते १५० दिवसांपर्यंत
    कारली ४५ ते १२० दिवसांपर्यंत
    दुधी भोपळा ६० ते १५० दिवसांपर्यंत
    कोबी ६० ते ८० दिवसांपर्यंत
    फ्लॉवर ६० ते ७५ दिवसांपर्यंत
    बीटरूट ६० ते ९० दिवसांपर्यंत
    काकडी ४५ ते ७५ दिवसांपर्यंत
    वांगी ४५ ते १५० दिवसांपर्यंत
    मिरची ४५ ते १२० दिवसांपर्यंत
    गाजर ६० ते ८० दिवसांपर्यंत

    संपर्क- राहुल घाडगे- ९४२२०८००११ (विषय विशेषज्ज्ञ (कृषी विस्तार) कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

    Soybean Farming: खेडच्या पूर्व भागामध्ये सोयाबीनला नवसंजीवनी

    Kharif Season Crisis: पिके तहानली; उपसाबंदीने शेतकऱ्यांची कोंडी

    Agriculture Department Staffing Plan: कृषी विभागाचा आकृतिबंध अखेर रद्द

    Flower Farmers Struggle: फुलबाजारातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवा

    SCROLL FOR NEXT