चारसूत्री, ड्रम सीडरने भात लागवड 
ॲग्रो गाईड

चारसूत्री, ड्रम सीडरने भात लागवड

चारसुत्री भात लागवड आणि ड्रम सीडरने पेरणी पद्धतीचे विश्लेषण

डॉ. बी. डी. वाघमोडे, डॉ. पी. बी. वणवे

चारसूत्री पद्धतीने लागवड  सूत्र १: भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर भात तुसाच्या राखेचा वापर (०.५ ते १ किलो प्रति चौ.मी.) लागवडीपूर्वी भाताचा पेंढ्यांचा वापर (२ टन प्रति हेक्टर) यातून ३० ते ४० किलो पालाश आणि १२० ते १४० किलो सिलिकॉन मिळते. सूत्र २: गिरिपुष्पाच्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर  ३ टन प्रति हेक्टर चिखलणीपूर्वी ६ ते ७ दिवस अगोदर शेतात पसरावा (१२ ते १५ किलो नत्र उपलब्ध) सूत्र ३ : भाताच्या सुधारित/संकरित जातींच्या रोपांची नियंत्रित लावणी  जोड ओळ पद्धतीने नियंत्रित लागवड १५-२५ बाय १५-२५ सेंमी (२५ चूड प्रति चौ.मी.) सूत्र ४: युरिया डीएपी ब्रिकेट्सचा वापर  २.७ ग्रॅम वजनाच्या युरिया-डीएपी ब्रिकेट्स(६०:४० प्रमाणात)  लावणीनंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक चार चुडांच्या (१५ बाय१ ५ सेंमी) मध्यभागी ७ ते १० सेंमी खोलीवर एक ब्रिकेट खोचावी.  १७० कि.ग्रॅ. प्रति हेक्टर. यातून प्रति हेक्टरी ५६ किलो नत्र व १४ किलो स्फुरद उपलब्ध. चार सूत्री पद्धतीचे फायदे   शिफारशीपेक्षा ४० टक्के रासायनिक खताची बचत.  बियाण्यांची ५० टक्क्यांपर्यंत बचत व परिणामी मजुरीवरील खर्च कमी.  उत्पादनात भरीव वाढ (सरासरी प्रति हेक्टरी ४ टन सुधारित जाती व ६ टन संकरित जाती)  खर्च : नफा गुणोत्तर - १: १.६० ड्रम सीडर भात पेरणी पद्धत १) आवश्यक बियाणे (किलो प्रति हेक्टर)  बारीक दाण्याच्या भात जाती - ६० ते ७०  मध्यम बारीक दाण्याच्या भात जाती - ७० ते ८०  जाड दाण्याच्या भात जाती - ८० ते ९० २) मोड काढून बियाण्याचा वापर  रहू पद्धतीने बियाण्यास ३ ते ५ मिमी लांबीचे मोड आणावेत. मोड आलेले बियाणे पेरणीपूर्वी १० ते १५ मिनिटे सावलीत वाळवावे. ३) शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा :  (१०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश किलो प्रति हेक्टर) ४) शिफारशीत सेंद्रिय खताच्या मात्रा;  शेणखत/हिरवळीचे खत १० टन प्रति हेक्टर ५) भात पेरणीचे दोन ओळींतील अंतर : २० ते २५ सें.मी. ६) ड्रम सीडरचा वापर :  मोड आलेल्या बियाण्याची ड्रम सीडरच्या साह्याने पेरणी करावी. ७) पाण्याचे नियोजन पेरणीनंतर २ ते ३ दिवस पाणी देऊ नये. भात रोपे वाढीस लागल्यानंतर पाण्याची पातळी वाढवावी. फायदे पुनर्लागवडीच्या खर्चात बचत खर्च : नफा प्रमाण - १ : १.१५ संपर्क : डॉ. बी. डी. वाघमोडे, ९४०४५८०४१६ (प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Power Shortage: विजेखालचा अंधार

Paddy Farming Crisis: मुळशी तालुक्यात भातपिकावर दुहेरी संकट

Sahyadri FPC Turnover: सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची उलाढाल २६०९ कोटींवर

Farmer Death: पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

Sugarcane Farmer Protest: धुराडे बंद पाडल्याशिवाय सोडणार नाही : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT