कांदाबियांचे गोंडे काढणीला आल्यावर बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते.
कांदाबियांचे गोंडे काढणीला आल्यावर बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते.  
ॲग्रो गाईड

कांदा, लसूण पीक सल्ला

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. मेजर सिंह

सद्यस्थितीत कांदा पिकाच्या बीजोत्पादनासाठी घेण्यात आलेल्या क्षेत्रातील पीक काढणीच्या अवस्थेत आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर त्यांची योग्य पद्धतीने साठवणुक करणे ही बाबही विशेष लक्ष देण्यासारखी आहे. त्यादृष्टिकोनातून नियोजन करावे. कांदा बीजोत्पादन पिकाच्या काढणीसाठी :

  • बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यात बी काळपट झाल्यावर गोंडे काढावे.
  • सर्व गोंडे एकदम तयार होत नाही. ते जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे ३ ते ४ वेळा गोंड्यांची काढणी हाताने खुडून करावी लागते.
  • गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले व पोचट बी वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे.
  • मळणी केलेले बियाणे स्वच्छ केल्यानंतर पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.
  • साठवणीतील कांदा व लसणाकरिता

  • कांद्याची सड आणि कोंब येणे या समस्या उद्भवू नयेत यासाठी साठवणुकीतील कांद्यांवर नियमित देखरेख ठेवावी. सडलेले, पिचलेले कांदे तात्काळ काढून टाकावेत. चाळीत हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी.
  • लसणाच्या गड्ड्या पातीसह हवेशीर चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवाव्यात.
  • संपर्क : डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५-२२२०२६ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

    Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

    Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

    Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

    Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

    SCROLL FOR NEXT