तुरीतील हेलिकोव्हर्पा अळीचा व मर रोगाचा प्रादुर्भाव. 
ॲग्रो गाईड

तूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण आवश्‍यक

डॉ. डी. टी. मेश्राम, डॉ. ज्योत्स्ना शर्मा, एस. एस. वडणे

मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया

खोडकूज : रोगकारक बुरशी : स्क्लेरोशियम रोल्फसाय व्यवस्थापन :

  • शेतातील  रोगट फांद्या,धसकटे इ. वेचून त्यांचा नायनाट करावा म्हणजे रोगाचा प्रसार टाळता येईल.
  • खोडकूज रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी शेतात पाणी साचलेले असल्यास चर खोदून पाणी ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
  • उभ्या पिकात दोन्ही रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्माची एकरी १ किलो भुकटी २०-२५ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे वापरावी.
  • मर : रोगकारक बुरशी : फ्युजॅरियम व्यवस्थापन : रोपावस्थेत रोगाची लक्षणे आढळल्यास ट्रायकोडर्माची एकरी १ किलो भुकटी २०-२५ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे द्यावी.

    खोडावरील करपा : कोलेटोट्रीकम करपा : रोगकारक बुरशी : कोलेटोट्रीकम डिमॅशियम व्यवस्थापन : प्रतिबंधक उपाय म्हणून शेतातील रोगट फांद्या व झाडे जाळून नष्ट करावीत. लेबल क्लेम शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी. फायटोप्थोरा करपाः रोगकारक बुरशी : फायटोप्थोरा ड्रेसलेरा व्यवस्थापन :

  • शेतात पाणी साचू देऊ नये. जास्त पाणी झाल्यास चर काढून ते बाहेर काढावे.
  • या रोगाची रोपावस्थेत तीव्रता आढळल्यास शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  •                  कीड नियंत्रण : आगामी दोन महिन्यात तुरीवरील शेंगा पोखरणारी कीड, पिसारी पतंग, शेंगमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो.  

    एकात्मिक कीड व्यवस्थापन :

  • पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना आठवड्यातून किमान १ वेळा हेक्टरी १२ ते २४ झाडांचे निरीक्षण करावे. शेतात प्रतिहेक्टरी  ५ लिंगाकर्षण सापळे पिकाच्या १ फुट उंचीवर लावावेत. सापळ्यामध्ये सतत ३ दिवस जर नर पतंगाची संख्या ८ ते १० इतकी आढळली किंवा १ अळी प्रति झाड किंवा ५ टक्के कीडग्रस्त शेंगा दिसल्यास किडीचे व्यवस्थापन करावे.
  • शेतात पक्षांना आकर्षित करण्यासाठी ३ ते ५ फूट लांबीचे १० ते ५० पक्षीथांबे प्रतिहेक्टरी उभारावेत. तुरीचे झाड वाकडे करून अळ्या खाली पाडाव्यात व नष्ट कराव्यात.
  • फुलोऱ्याच्या सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • रासायनिक नियंत्रण :  

  • एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर टाळावा. प्रत्येक फवारणीवेळी कीटकनाशकांची फेरपालट करावी. शिफारशीपेक्षा कोणत्याही घटकाची कीटकनाशकासोबत फवारणी करू नये.
  • शिफारशीत कीटकनाशकांची पहिली फवारणी पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना व दुसरी १५ दिवसांनी करावी. गरज असल्यास तिसरी फवारणी करावी.  
  • पहिली फवारणी : प्रमाण प्रतिलिटर पाणी क्विनाॅलफाॅस (२५ टक्के ईसी) २ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८५ ईसी) ०.७ मि.लि.  
  • दुसरी फवारणी : प्रतिलिटर पाणी इमामेक्टिन बेन्झोइट (५ टक्के एसजी) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मि.लि.
  • तिसरी फवारणी : प्रतिलिटर पाणी क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल ९.३ टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४.६ टक्के (मिश्र कीटकनाशक) ०.४ मि.लि.
  • संपर्क : डाॅ. ए. एन. पाटील, ९७६६१७०१९५ (कडधान्य संशोधन विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

    Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

    Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

    Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

    Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

    SCROLL FOR NEXT