सद्यस्थितीत शेवंती पिकाची लागवड केल्यास सणांच्या काळात दर्जेदार फुले बाजारात आणता येतात. 
ॲग्रो गाईड

शेवंती लागवडीसाठी अनुकूल काळ

डॉ. सतीश जाधव

शेवंतीच्या वाढ व उत्पादनावर तापमान व सूर्यप्रकाश या घटकांचा मोठा परिणाम होतो. सद्यःस्थितीत लागवड केल्यास दसरा, दिवाळी, नाताळ आदी सणांच्या कालावधीत फुलांची उपलब्धता करता येते. परिणामी शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतो .

शेवंतीची लागवड करताना संपूर्ण पीक कालावधीतील हवामान परिस्थितीचा विचार करावा. भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी योग्य जमिनीत लागवड ही बाबही महत्त्वाची आहे. जमीन शेवंतीची मुळे तंतुमय असतात. जमिनीत खोलवर जात नाहीत, त्यामुळे लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. अत्यंत भारी जमिनी पाणी धरून ठेवतात. त्यामुळे शेवंतीला मूळकूज रोग होतो म्हणून लागवडीसाठी मध्यम जमीन (सामू ६.५ ते ७) उपयुक्त ठरते. जमिनीच्या क्षारतेचे प्रमाण ०.२ टक्के पेक्षा कमी व चुनखडीचे प्रमाण ५.८ टक्क्यांपेक्षा कमी असावे. भारी व चोपण जमिनीत तसेच पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत लागवड करू नये. हवामान शाकीय वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व २०-३० अंश सेल्सिअस तापमानाची (मोठा दिवस) आवश्‍यकता असते. मात्र फुले येण्यासाठी लहान दिवस असलेला काळ लागतो. हिवाळ्यात फुले येतात तेव्हा १० तास सूर्यप्रकाश व १४ तास रात्र आवश्‍यक (१५ ते २६ अंश सेल्सिअस तापमान) आहे. पिकाला जोराचा पाऊस व धुके मानवत नाही. वेळ पाणी उपलब्ध असल्यास शेवंतीची लागवड मे महिन्यात करावी. या काळात लागवड केलेल्या पिकास दसरा - दिवाळी दरम्यान फुले येतात. पाण्याची सोय नसेल तर लागवड पाऊस सुरू झाल्यानंतर जून - जुलैमध्ये करावी. या लागवडीस डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात फुले येतात. संपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वयित पुष्प संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT