पेरू लागवड
पेरू लागवड  
ॲग्रो गाईड

पेरू लागवड कशी करावी?

उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर

पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.

लागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे. उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे.

संपर्क : ०२४२६- २४३२४७ उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT