कीड व्यवस्थापन
कीड व्यवस्थापन  
ॲग्रो गाईड

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

डाॅ. एम. एस. लदानिया, दिनकर नाथ गर्ग

सद्यःस्थितीत लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये डिंक्या, फायटोफ्थोरा आदी रोग व खोडकीड, साल खाणारी अळी, मिली बग आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, तसेच छाटणीनंतरच्या व्यवस्थापनाबाबत उपाययोजना कराव्यात.   पीक संरक्षण रोग व्यवस्थापन

  • झाडावरील फांद्या कापणीनंतर, कात्रीला सोडियम हायपोक्लोराइट १-२ टक्के द्रावणामध्ये बुडवून निर्जंतुकीकरण करावे.
  • झाडाच्या बुंध्यावर ६० सें.मी. उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट ब्रशच्या साह्याने लावावी. (बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी मोरचूद १ किलो व चुना १ किलो वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ५ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही तयार केलेली पेस्ट १२ तासांच्या आत वापरावी.)
  • संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास, तो तीक्ष्ण चाकूने खरवडून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झिल ४ टक्के अधिक मॅंकोझेब ६४ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) २०० ग्रॅम किंवा फोसेटील ए एल २०० ग्रॅम प्रति २५० मि.लि. पाण्यात मिसळून पेस्ट करावी. ही पेस्ट डिंक्या झालेल्या ठिकाणी लावावी.
  • फायटोफ्थोराग्रस्त झाडावर मेटॅलॅक्झिल ४ टक्के अधिक मॅंकोझेब ६४ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून फवारणी करावी. फवारणी करताना संपूर्ण झाड ओले होईल, असे पाहावे. उर्वरित द्रावणाची झाडाभोवती आळवणी करावी.
  • कीड व्यवस्थापन खोडकिडा, ईंडरबेला किंवा साल खाणारी अळी : नियंत्रणासाठी अळीने पाडलेल्या छिद्रातील साल काढावी. इंजेक्शनच्या मदतीने शिफारशीत कीटकनाशक छिद्रात टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे. संत्र्यावरील पिठ्या ढेकुण :   झाडाभोवतीची जमीन चाळणी करून मोकळी करावी. झाडाच्या खोडाला प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावून त्यावर ग्रीस लावावे. पिठ्या ढेकुण वाहून नेण्याचे काम मुंग्या करतात, त्यामुळे मुंग्यांची वारुळे बागेमध्ये असल्यास नष्ट करावीत. त्यासाठी क्लोरपायरिफाॅस (२० ई.सी.) ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी हे द्रावण मुंग्यांच्या वारुळातून टाकावे. फवारणी प्रतिलिटर पाणी. क्लोरपायरिफाॅस (२० ई. सी.) २ मि.लि. टीप : झाडावर व झाडाच्या बुंध्यावर फवारणी करावी. संपर्क : डाॅ. एम. एस. लदानिया, ०७१२- २५००३२५, दिनकर नाथ गर्ग, ९८२२३६९०३० (राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

    Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

    Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

    Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

    Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

    SCROLL FOR NEXT