Tur Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Harvesting : तूर कापणी प्रयोगाला ‘झेडपी सीईओं’ची हजेरी

Crop Harvesting Experiment : जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तूर पिकाचा समावेश असून सध्या तुरीच्या मळणीचा हंगाम सुरू झालेला आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तूर पिकाचा समावेश असून सध्या तुरीच्या मळणीचा हंगाम सुरू झालेला आहे.

या काळात अकोला तालुक्यात पंचायत समिती स्तरावर आठ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले असून याअंतर्गत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी उगवा येथे भेट देत तूर पिकाची पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ.तुषार जाधव, गटविकास अधिकारी राजेश खुमकर, कृषी अधिकारी रोहिणी मोघाड, विस्तार अधिकारी गजानन गावंडे, मनोज बोपटे, सरपंच गजानन बहाकार, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत क्षीरसागर, विमा प्रतिनिधी शुभम हरणे उपस्थित होते.

विमा नुकसान भरपाई ही पीकविमा प्रयोगाच्या उत्पादकतेवरून निश्‍चित होत असते. हे लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून उगवा येथे रितेश पटेल यांच्या तुरीच्या शेतात उपस्थिती लावली.

शेताची निवड, निवड केलेल्या शेतात रँडम पद्धतीने प्लॉटची आखणी करणे, निवडलेल्या क्षेत्रातून प्रत्यक्ष कापणीची पाहणी व उपस्थित शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व पटवून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT