Zero tillage Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Zero Tillage Technology: शून्य मशागतीचे फायदे काय आहेत ?

लागवड खर्चात (Cultivation) बचत करून जमीनीची सुपीकता (Fertility) वाढविण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या शिवाय शून्य मशागत तंत्राचा अवलंब केल्यास पुढील फायदे मिळतात.

Team Agrowon

संवर्धित शेती पद्धतीचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी विकसित केलेले तंत्र म्हणजे "शून्य मशागत तंत्र" (Zero tillage Technology) होय. लागवड खर्चात (Cultivation) बचत करून जमीनीची सुपीकता (Fertility) वाढविण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या शिवाय शून्य मशागत तंत्राचा अवलंब केल्यास पुढील फायदे मिळतात.

शून्य मशागत तंत्राचे फायदे
- मातीच्या सुपीक थरांमध्ये फारशी उलथापालथ होत नाही.
- सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये दीर्घकालीन साठवण होण्यास मदत होते.

- सातत्याने सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
- पूर्वीच्या पिकाची मुळे जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जलद गतीने वाढते.
- जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे रासायनिक खताची बचत होते.

- विपुल प्रमाणात जमिनीमध्ये गांडूळांचा संचार सुरु होतो.
- जमिनीत जैविक विविधतेत वाढ होऊन मातीचे आरोग्य सक्षम होते.
- मातीचे तापमान नियंत्रित राहते.
- मातीच्या कणांची रचना सुधारते.

- जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूप कमी होते.
- मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन पिकाच्या मुळाशी वायू आणि पाणी यांचे प्रमाण योग्य राहते.
- बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहिल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होतो.

- पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते.
- एकरी रोपांची संख्या नियंत्रित केल्यामुळे बियाण्याची बचत होते.
- पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

- मशागतीसाठी लागणारे मनुष्यबळ यात बचत होते.
- मशागत खर्च शून्यावर येऊन उत्पादन खर्चामध्ये मोठी बचत होते.
- उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि पौष्टिक अन्नधान्याची निर्मिती होते.

- पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते.
- दोन पिकांमधील मशागतीचा वेळ वाचून पिकाची लवकर लागवड करणे शक्य होते.
-------------------------

स्त्रोत ः शून्य मशागत तंत्र पुस्तिका ः विजय कोळेकर, कृषि विद्यावेत्ता, पोकरा, मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT