Shetkari Sangh Election agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Election : मंत्री हसन मुश्रीफांना धक्का! खंदे समर्थक शेतकरी संघाच्या निवडणुकीतून बाहेर

Shetkari Sangh kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर शेतकरी संघाच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Shetkari Sangh Election : मागच्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर शेतकरी संघाच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक आणि संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांचा उमदेवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आला आहे.

यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जात आहे. तसेच शेतकरी संघाची निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

भू-विकास बँकेचे थकबाकीदार म्हणून त्यांना सहकारी संस्थांची निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हाच आधार घेऊन जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी श्री. पाटील यांच्यासह एम. एम. पाटील यांचाही उमदेवारी अर्ज अपात्र ठरवला आहे.

शेतकरी संघाच्या निवडणुकीत १९ जागांसाठी विविध गटांतून २९२ जणांनी ३३२ उमदेवारी अर्ज दाखल केले आहेत. (ता. २६) जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये यशोधन शिंदे यांनी युवराज पाटील आणि एम. एम. पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. युवराज पाटील यांनी भू-विकास शेतकरी संघ निवडणूक बँकेचे कर्ज थकीत ठेवल्यामुळे त्यांना सहकारी संस्थांची पुढील निवडणूक लढवण्यास सहा वर्ष बंदी घातली होती.

२०१७ मध्ये ही बंदी लागू केली होती. त्यानुसार आता पाच वर्षेच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे श्री. पाटील यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवावा, अशी मागणी शिंदे यांनी केली होती. त्यानुसार युवराज पाटील यांच्यासह एम. एम. पाटील यांचा अर्ज अपात्र ठरवला आहे. तर जयसिंग हिर्डेकर यांचा अर्ज पात्र ठरवला आहे. संघाच्या निवडणुकीत आता २९१ उमेदवार असून माघार कोणकोण घेणार याकडे लक्ष लागले आहे.

संघ बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा होती. यामध्ये कोणतेही राजकारण येणार नाही, त्यामुळे अर्ज दाखल करण्यापासून निवडणूक लढवण्यापर्यंत सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू होते. दरम्यान, युवराज पाटील यांच्या अर्जावर हरकत घेऊन राजकारण केले जात असल्याचे सांगत कार्यकर्ते संतप्त झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT