Jalyukt Shiwar  Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukt Shiwar Work : नांदेडला १४३ गावांत ‘जलयुक्त’ची कामे

Jalyukt Shiwar Scheme : नांदेड जिल्ह्यातील १४३ गावांत जलयुक्त शिवार योजना २.० राबविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांकडून कृती आराखडा अंतिम करून सदस्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील १४३ गावांत जलयुक्त शिवार योजना २.० राबविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांकडून कृती आराखडा अंतिम करून सदस्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे. या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळताच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात यापूर्वी जलयुक्त शिवार योजना २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली होती. परंतु २०१९ मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने ही योजना बंद करण्यात आली. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर १३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, ही योजना महाराष्ट्र जलयुक्त शिवार २.० म्हणून ओळखली जात आहे.

योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत २०२३-२४ या वर्षात तीन हजार ८८६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जलयुक्तचा पहिला टप्पा, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गावसह इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रममधील पूर्ण झालेली आणि कार्यान्वित गावे वगळून उर्वरित गावांपैकी पाणलोट कार्यक्रम अंमलबजावणीसाठी पाच मुद्यांच्या आधारे गावांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

जिल्ह्यात १४३ गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाकडून सर्व यंत्रणाकडून कृती आराखडा तयार करून घेतला आहे. या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेण्याचे काम सुरू आहे. या समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर कामांना कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाकडून देण्यात आली.

विविध स्रोतांमधून निधीची उपलब्धता

केंद्र व राज्य पुरस्कृत मृद आणि जलसंधारण-कृषी विभागाच्या योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, जिल्हा नियोजन व विकास समिती निधी, जिल्हा परिषद, सीएसआर निधी, सार्वजनिक खासगी भागीदारी, लोकसहभाग आदी स्रोतांमधून निधीची उपलब्धता केली जाणार आहे. अभिसरणातून निधी उपलब्ध न झाल्यास जलयुक्तच्या लेखाशीर्षातून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

Cotton Farmers Crisis: कापूस वेचणी दर स्थिर, मजूरटंचाईची समस्या मात्र कायम! शेतकऱ्यांसमोर नवे संकट

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT