Jal Jeevan Mission  Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : आंबेगाव तालुक्यातील ‘जलजीवन’ची कामे रखडली

Water Supply Scheme : केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली नळ पाणीपुरवठ्याची जलजीवन मिशन योजना मुदतीत पूर्ण होणार नसल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यात दिसत आहे.

Team Agrowon

Pune News : केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली नळ पाणीपुरवठ्याची जलजीवन मिशन योजना मुदतीत पूर्ण होणार नसल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यात दिसत आहे. यामुळे आंबेगावच्या आदिवासी भागात याही वर्षी नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

ठेकेदारांना असणारा तंत्रज्ञानाचा अभाव, क्षमतेपेक्षा जास्त कामे घेणे व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आंबेगाव तालुक्यात मंजूर ११८ कामांपैकी फक्त ५ कामे पूर्ण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. अनेक ठिकाणी पाइप जमिनीखाली न गाडल्यामुळे, तर काही ठिकाणी अर्धवट काढल्यामुळे ३१ मार्चपर्यंत या सर्व नळ पाणीपुरवठा योजना कशा पूर्ण होतील, याबाबत साशंकता आहे.

ही योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. आताची वस्तुस्थिती पाहता या योजनेला पुन्हा १ वर्षाची तरी मुदतवाढ मिळावी, अशी ठेकेदारांची मागणी आहे. योजनेची सुरुवात होताना ठेकेदाराने पाइप मागवून शासनाकडून बिल काढून घेतले. सर्वसाधारण ६ महिने ते १ वर्षापासून हे पाइप अजूनही काही ठिकाणी जमिनीखाली गाडले गेले नाहीत.

ठेकेदारांनी जास्तीत जास्त कामे टेंडर पद्धतीने मंजूर करून घेण्यात जास्त लक्ष दिल्याने प्रत्यक्षात काम मात्र संथ गतीने होत आहे. ठेकेदार सक्षम नसताना करोडो रुपयांची कामे काही ठरावीक ठेकेदारास दिली गेली. टेंडरमध्ये कोणतीही साधन सामग्री, मशीनरीची अट जाणीवपूर्वक टाकली गेली नाही. बनावट बीड कपॅसिटी, कमी बीड कपॅसिटी असतानासुद्धा कामे दिली गेली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याकडे त्याबाबत तक्रारी केल्यानंतर त्यांच्या चौकशीनंतर दोषी धरूनही काळ्या यादीत ठेकेदारांना न टाकता पुन्हा त्याच ठेकेदारास कामे दिली आहेत. या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पाटील यांनी केल्या आहेत. प्रशासनाने कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सर्व कामकाज नियमानुसार केले आहे. ठेकेदाराने सादर केलेले बीड कपॅसिटी पाहून त्यांना कामे दिली आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही टेंडर काढली जातात. यात कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही. यात कुठल्याही प्रकारचे गैरकाम केलेले नाही. ३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत.
- प्रकाश खताळ, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT