Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Agriculture Loan : जिल्ह्यात उद्दिष्टानुसार पीककर्जाचे वाटप न केल्याप्रकरणी दहा बँक अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात उद्दिष्टानुसार पीककर्जाचे वाटप न केल्याप्रकरणी दहा बँक अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे बँक अधिकारी व कर्मचारी संतप्त झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी ३० ऑगस्टच्या बैठकीत आश्‍वासन दिल्यानुसार नव्याने अहवाल मागवून हे गुन्हे मागे घ्यावेत.

या व अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना गुरुवारी (ता. १२) निवेदन देऊन सायंकाळी बँक परिसरात टॉर्च मार्च काढण्यात आला. यात टॉर्च चालू मोबाइल उंचावत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागण्यांच्या घोषणा दिल्या.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सरकारच्या बहुतांश लोकहिताच्या योजना बँकांमार्फत राबवल्या जातात. बँक अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस व प्रसंगी सुटीच्या दिवशी काम करून योजनेच्या अंमलबजावणीत योगदान देतात. असे असतानाही राज्यात बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर राजकीय व सवंग प्रसिद्धीसाठी हल्ले केले जात आहेत. या घटना घडत असताना जिल्हा प्रशासनाचाच एकमेव आधार अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे.

प्रशासनाकडून संरक्षण मिळाले तरच अधिकारी व कर्मचारी सुरक्षित भावनेने काम करू शकतात. मात्र जिल्ह्यात उद्दिष्टानुसार पीककर्जाचे वाटप केले नाही म्हणून विविध दहा बँकांच्या शाखाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्जवाटपात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतीही दिरंगाई केलेली नाही.

कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची नकारात्मक व असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ३० ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत आश्‍वासन दिल्यानुसार पुन्हा एकदा अहवाल मागवून घेऊन बँक अधिकाऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी संघटनेचे भूषण महाजन, धनंजय कुलकर्णी, प्रताप हंथराळे, कृष्णा बरुरकर, संतोष गदादे यांच्यासह धाराशिव, सोलापूर, लातूर आणि बीड जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT