Assembly Agrowon
ॲग्रो विशेष

Winter Assembly Session 2023 : हिवाळी अधिवेशन होणार ७ ते २० डिसेंबरदरम्यान

Winter Assembly 2023 Nagpur : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते २० तारखेपर्यंत सुरू राहील.

Team Agrowon

Nagpur Adhiveshan : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते २० तारखेपर्यंत सुरू राहील. दरम्यान १९ डिसेंबर रोजी संसदीय कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार आहे.

विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बुधवारी (ता. २९) बैठक झाली. या वेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री, दोन्ही सभागृहांचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.

(ॲग्रो विशेष)

श्री. वडेट्टीवार यांनी अधिवेशन तीन आठवड्यांचे आणि कामकाजाचे दिवस १५ दिवसांचे असावे, अशी मागणी केली. नागपूर करारानुसार अधिवेशन तीन आठवड्यांचे असावे, असा आग्रह त्यांनी धरला.

गुरुवारी ७ डिसेंबर रोजी कामकाजाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत अध्यादेश पटलावर ठेवले जातील. पुरवणी मागण्याही सादर केल्या जातील. ११ व १२ डिसेंबर रोजी शासकीय कामकाजासह पुरवणी मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे.

प्रत्यक्ष कामकाज होणार १० दिवस

बैठकीत १४ दिवसांचे अधिवेशन घेण्याचे निश्चित करण्यात आले. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) असतील. प्रत्यक्ष कामकाज १० दिवस चालेल. शनिवारी आणि रविवारसह ४ दिवस सुट्ट्या असतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT