Date Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Subsidy: खजूर लागवडीसाठी सरकार पाठबळ देणार का? 

खजुराच्या रोपांची किंमत खूप जास्त आहे. तसेच बाजारात चांगल्या प्रतीची रोपं उपलब्ध होत नाहीत. तसेच खजुराचे फळ परिपक्व होण्यास लागणारा कालावधी अधिक असतो.

Team Agrowon

Khajur Lagawad: कमी पाण्यात येणाऱ्या पिकांपैकी एक पीक म्हणजे खजूर. महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात शेतकरी खजूराचं पीक प्रयत्न करत असतात.  खजूर पिकात आंतरपीक घेता येतं. परंतु खजूर पिकाचा उत्पादन खर्च अधिक असल्यानं नवीन प्रयोग करण्याचं शेतकरी टाळतात.

खजुराच्या रोपांची किंमत खूप जास्त आहे. तसेच बाजारात चांगल्या प्रतीची रोपं उपलब्ध होत नाहीत. तसेच खजुराचे फळ परिपक्व होण्यास लागणारा कालावधी अधिक असतो. त्यामुळे खजूराला बाजारात विशेष मागणी असून देखील महाराष्ट्रातील शेतकरी खजूराची लागवड करत नाहीत राज्य सरकारनं पुढाकार घेऊन खजूर लागवडीसाठी अनुदान देऊन राजस्थान सरकारसारखं प्रोत्साहन द्यावं, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

एकनाथ खडसेंचा प्रयोग

खानदेशांत केळी आणि कापूस प्रमुख पिकं आहेत. परंतु या पिकांऐवजी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी १५ एकर क्षेत्रावर खजूर लागवडीचा प्रयोग केला. खजुराला चार ते पाच वर्षानी फळ लागतं. यंदा खडसे यांच्या शेतातील खजुर परिपक्व होऊन काढणीस आले आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

खडसे यांनी लागवड केलेल्या बरही खजुराची रोपं आखाती देशातून विमानानं आयात केली होती. रोपांची विशेष काळजी घ्यावी लागल्याचे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं होतं. देशातील राजस्थान आणि गुजरातमध्ये खजुराची लागवड केली जाते. परंतु ते चवीला तूरट असल्यामुळे खडसे यांनी आखाती देशातून रोपं आयात केली होती. पावसांचं प्रमाण कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांना खडसे यांच्या प्रयोगानंतर खजूर लागवड खुणावू लागली आहे, परंतु रोपांच्या किंमतीमुळे शेतकरी अजून धाडस करण्यास तयार नाहीत. 

खजुराची बाजारपेठ

आखाती देशात खजुरांची विशेष मागणी असते. दुबई, संयुक्त अमराती अरब आदी देशात खजुरावर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती केली जाते. ओल्या खजूरासोबतच, खारीक, कोरडा खजूर यासाठी बाजारात मोठी मागणी आहे. तसेच स्थानिक बाजारात देखील खजुराला मागणी असते. त्यामुळे खजूर लागवड फायदेशीर ठरू शकेल का, याची चाचपणी शेतकरी करत आहेत. यापूर्वीही अहमनगर, सोलापूर, जळगाव आदि जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी खजूर लागवडीचे प्रयोग केले आहेत. परंतु सरकारच्या पाठबळाशिवाय खजूर लागवड परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात. 

राजस्थान सरकार देतंय अनुदान

राजस्थान सरकार खजूर लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ७५ टक्के अनुदान देत आहे. खजुराच्या एका रोपांचा भाव २ हजार रुपये आहे. इतक्या महाग रोपांची शेतकरी खरेदी करून लागवड करण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे राजस्थान सरकार ७५ टक्के अनुदान देऊन २ हजार रुपयांचे रोप ३७५ रुपयांना उपलब्ध करून देत आहे. एकरी १५० ते १७० रोपांची लागवड शेतकरी करत आहेत. सरकारच्या अनुदानामुळे राजस्थानमधील खजूर पिकाला पसंती देत असल्याचं शेतकरी सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT