Sugar Cane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटणार का?

Sugarcane Season : उसाला पहिली उचल एफआरपी अधिक १०० रुपये मिळावी यासाठी राजारामबापू कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Sangli News : उसाला पहिली उचल एफआरपी अधिक १०० रुपये मिळावी यासाठी राजारामबापू कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आठ डिसेंबरपर्यंत कारखानदारांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन दिले.

अद्याप बैठकही झालेली नाही. त्यामुळे ऊस दराची कोंडी फुटणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, ऊस दराबाबत शनिवारी (ता. ९) बैठक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी आंदोलनानंतर फुटली. मात्र, सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत साखर कारखान्यांनी दुर्लक्ष केले होते. दरम्यान, कडेगाव येथे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कारखान्यांनी पहिली उचल ३१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला.

परंतु हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मान्य केला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करत गाळप बंद पाडले. दराबाबत केवळ बैठकांच्या फेऱ्याच झाल्या, यामध्ये दराची कोंडी फुटली नाही.

दरम्यान, प्रशासनाने ऊस दराबाबत पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले. या वेळी शुक्रवार (ता. ८) पर्यंत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी यांच्यासमेवत बैठक घेण्याची मुदत होती. मात्र, जिल्ह्यातील साखर कारखानदार बैठकीबाबत अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऊस दराची कोंडी फुटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

आज बैठक होण्याची शक्यता

ऊस दराबाबत तीन दिवसांत बैठक झाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे शनिवारी (ता. ९) बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, बैठक घेण्याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: ‘फार्मर आयडी’चे अपेक्षित लाभ कधी?

El Nino Forecast: ‘एल निनो’ मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची ९७ टक्के शक्यता

Dairy Business: तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे: अरुण चांभारे

Heavy Rain: धरण क्षेत्रात पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Soybean Seed Case: सोयाबीन बियाणे प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत; राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांची माहिती

SCROLL FOR NEXT