PM Kisan 13th Installment Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan 13th Installment: पीएम किसानचा हप्तात खरंच वाढणार का?

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यांमध्ये पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Team Agrowon

केंद्र सरकारच्या २०२३ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान योजनेची (Pm Kisan Scheme) रक्कम वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार २०२३ मध्ये किसान सन्मान योजनेत २ हजारांची भर घालणार आहे. यावर अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसानचा निधी वाढवण्याची तरतूद करण्यात येणार आहे, अशीही माहिती आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यांमध्ये पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

२०१८ साली सुरू झालेल्या पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकार दरवर्षी ६ हजार रुपये जमा करते. तीन टप्प्याच्या अंतराने केंद्र सरकार २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते.

ऑक्टोबर २०२२ मध्ये या योजनेचा १२ व्या हप्ता जमा करण्यात आला होता. जानेवारी २०२३ च्या पहिल्या १३ वा हप्ता जमा होईल, अशीही चर्चा सुरू होती. मात्र अजूनही शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT