Namo Installment  Agrowon
ॲग्रो विशेष

Namo Installment : पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्र मिळणार का?

Namo nidhi Scheme: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाशिम जिल्ह्यात पीएम किसानच्या १८ व्या आणि नमो किसानच्या ५ व्या हप्त्याचं वितरण केलं होतं. पीएम किसानच्या १८ व्या हप्त्याचे वितरण ९.४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आलं होतं.

Dhananjay Sanap

PM Kisan E-kyc: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ जानेवारी रोजी बिहारमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधीचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. तर राज्य सरकारच्या नमो सन्मान निधी योजनेचा ६ वा हप्ता १ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाशिम जिल्ह्यात पीएम किसानच्या १८ व्या आणि नमो किसानच्या ५ व्या हप्त्याचं वितरण केलं होतं. पीएम किसानच्या १८ व्या हप्त्याचे वितरण ९.४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आलं होतं. तर राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांना पीएम किसानसह नमोचा हप्ता जमा करण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने २०२३ पासून नमो शेतकरी महासन्मान योजनांचा राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेतुन आत्तापर्यंत ५ हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे.

पीएम किसानच्या १८ हप्त्यासाठी पात्र ठरलेली शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ६ व्या हप्त्यासाठी पात्र ठरली आहेत. राज्यात पीएम किसानसाठी ९१ लाख शेतकरी पात्र ठरले होते. त्यामुळे नमोच्या ६ व्या हप्त्याचं वितरण या शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने विविध योजना राबवल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडलेला आहे. त्यामुळे पीएम आणि नमोचे मिळून १ हजार घेणाऱ्या शेतकरी महिलांना यापुढे लाडकी बहिण योजनेतून प्रतिमहा १ हजार ५०० ऐवजी ५०० रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या दोन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकीतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT