Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar: संभाजी महाराज स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही: अजित पवार

Sambhaji Maharaj Memorial Fund: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असून, निधीची कमतरता जाणवू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुळापूर येथील पाहणी दौऱ्यात दिली. स्मारक भव्य आणि प्रेरणादायी स्वरूपात उभारले जाणार आहे.

गणेश कोरे

Shirur News: ‘‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अतुलनीय शौर्य, पराक्रम व प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीला समजावा, यासाठी श्रीक्षेत्र तुळापूर, वढू बुद्रुक प्रमाणेच रत्नागिरीत संगमेश्वर येथेही राजांचे दर्जेदार स्मारक उभारण्याचा शासन प्रयत्नशील असून, ही तीनही स्मारके उभारताना शासन निधी कमी पडू देणार नाही,’’ अशी ग्वाही देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.२९) तुळापूर येथे सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी करीत स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाराऱ्यांना दिल्या.

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र तुळापूर येथे बलिदानस्थळी राजांना अभिवादन करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

या वेळी त्यांच्यासमवेत आमदार माऊली कटके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता अमोल पवार यांच्यासह अनेक अधिकारी व मान्यवरही उपस्थित होते.

या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी तुळापूर येथे सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी करीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पुलासह उर्वरित कामासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तसेच नदीकाठच्या जुन्या घाटाला जोडून नव्या घाटाच्या कामासह स्मारकाच्या विविध ऐतिहासिक पद्धतीच्या इमारतींचे बांधकाम दर्जेदार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

‘‘स्मारक उभारताना सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक वढू-तुळापुरात उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असून पालकमंत्री म्हणून माझे बारकाईने लक्ष आहे. ऐतिहासिक प्रेरणादायी स्मारके उभारताना ऐतिहासिक संदर्भ, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायती व संबंधित प्रमुख घटकांना विचारात घेऊनच स्मारक उभारणी करण्यात येत असून याबाबत नागरिकांच्या काही नवसंकल्पना, सूचनांचाही विचार स्मारक उभारणीत केला जाईल,’’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT