Solapur DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur DCC Bank : मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा पैसा येईपर्यंत लढणार

Co-Operative Bank : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका रुपयातही मी मिंदा नाही. सभासदांनी काबाड कष्टाने कमावलेली पुंजी बँकेत ठेवली.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका रुपयातही मी मिंदा नाही. सभासदांनी काबाड कष्टाने कमावलेली पुंजी बँकेत ठेवली. तत्कालीन संचालकांनी नियमबाह्य व बेकायदेशीर कर्जवाटप केल्याने कर्जे थकली, एनपीए वाढला. सभासदांना अनेक वर्षांपासून लाभांश मिळत नाही, नव्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही. बँकेतील हा कारभार २०११ मध्ये मीच बाहेर काढला.

त्यासाठी मंत्रालय, उच्च न्यायालयापर्यंत संघर्ष केला. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा पूर्णता: वसूल होईपर्यंत मी थांबणार नाही. शेतकऱ्यांचा पैसा वसूल होईपर्यंत कोणालाही सोडणार नाही? अशी ठाम भूमिका याचिकाकर्ते तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली.

माजी आमदार राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयापर्यंत आवाज उठविल्याने शेवटच्या न्यायालयाच्या आदेशाने बँकेच्या नुकसानप्रकरणी तत्कालीन संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर २३८ कोटी रुपयांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. निश्‍चित झालेल्या जबाबदारीतून ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेला सहकार कायदा कलम ९८ अन्वये वसुली दाखला मिळाला आहे.

या प्रकरणातील मंडळी कायद्याच्या बाबतीत हुशार आहेत. त्यांना कायद्यातील पळवाटा आणि सत्तेचा लाभ कसा उठवायचा? हे चांगले माहिती आहे. गेल्या १३ वर्षांपासून मी देखील ही प्रक्रिया कोळून प्यालो आहे. त्यामुळे मी देखील तयारी केली आहे. या प्रक्रियेला स्थगिती मिळू नये, ही प्रक्रिया वेळेत पार पाडावी यासाठी मी सहकार मंत्रालय व उच्च न्यायालय या ठिकाणी कॅव्हेट दाखल केल्याची माहितीही माजी आमदार राऊत यांनी दिली.

सहकारमंत्र्यांनाही पत्र देणार

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारमध्ये सहकारमंत्री कोण होईल माहिती नाही, जे कोणी सहकारमंत्री होतील त्यांना मी पत्र देणार असल्याचे माजी आमदार राऊत यांनी सांगितले.

ही प्रक्रिया वेळेत संपवा, यामध्ये विलंब लावू नका, अशी विनंती करणार आहे. पुन्हा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची माझी तयारी आहे. देशातील सहकारी बँकांना आदर्श ठरेल, सहकारी बँकांना शिस्त लावेल, सहकारातील सभासद, शेतकऱ्यांचे हित जोपासेल असाच अंतिम निकाल या प्रकरणाचा असेल, असा विश्‍वासही माजी आमदार राऊत यांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT