PM Awas Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Union Budget 2024 : पंतप्रधान आवास योजनेतून २ कोटी घरं बांधणार ; अर्थमंत्र्यांची घोषणा

PM Awas Yojana : गेल्या १० वर्षात देशात परिवर्तनाचा काळ राहिल्याचे सांगत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे त्या म्हणाल्या.

Mahesh Gaikwad

Union Budget Live Update : अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज (ता. १) लोकसभेत सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सितारामण यांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी दिली. तसेच केंद्र सरकारच्या 'सबका साथ सबका विकास, सबका विश्वास' या व्हिजनचा उल्लेखही सितारामण यांनी केला.

देशाची अर्थव्यवस्था अतिशय वेगाने प्रगती करत असल्याचे सितारामण यांनी सांगितले. गेल्या १० वर्षात देशात परिवर्तनाचा काळ राहिल्याचे सांगत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्प असल्याने आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत.

दोन कोटी घरे बांधणार

केंद्र सरकारच्या पीएम आवास योजनेचा अनेकांना फायदा झाल्याचे सितारामण यांनी सांगतिले. कोरोना महामारीच्या काळातही आव्हानांचा सामना करत पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागात ३ कोटी घरे बांधण्यात आली आहे.

तसेच आवास योजनेंर्गत देशात पुढील पाच वर्षांमध्ये दोन कोटी घरे बांधली जातील, अशी घोषणा सितारामण यांनी केली. याशिवाय देशातील १ कोटी घरांवर सुर्योदय योजनेतून सोलर पॅनेल बसविण्यात येतील. सौरउर्जेतून ३०० युनिट वीज मोफत देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

'लखपती दीदी'ची व्याप्ती वाढवणार

देशातील एक कोटीहून अधिक महिला लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून लखपती बनल्या आहेत. त्यामुळे आता या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट २ कोटींवरून ३ कोटींवर नेण्यात आले आहे. यामुळे देशातील ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाल्याचे सितारामण म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT