Wild Boar Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Boar Crop Damage : सोयाबीन, तूर पिकांत रानडुकरांचा धुमाकूळ

Wild Animal Attack : पेरणीनंतर कोवळे अंकुर उगवलेल्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घालत चार एकरांतील सोयाबीन आणि तुरीचे पीक फस्त केले आहे.

Team Agrowon

Washim News : पेरणीनंतर कोवळे अंकुर उगवलेल्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घालत चार एकरांतील सोयाबीन आणि तुरीचे पीक फस्त केले आहे. या मध्ये दोन शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिवाय त्या शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारंजा तालुक्यातील इंगलखेड शिवारात शनिवारी (ता. ५) रात्री या वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला. तालुक्यातील कामठा येथील शेतकरी इस्माईल खान व इंद्रीस खान यांची इंगलखेड शिवारात अनुक्रमे सर्वे नंबर ६५ व ७८ मध्ये प्रत्येकी तीन एकर शेती आहे.

त्यात त्यांनी २० जून रोजी सोयाबीन व तुरीची पेरणी केली. त्यानंतर पिकांचे कोवळे अंकुर उगवले. अशातच उगवलेल्या पिकात शनिवारी (ता. ५) रात्री रानडुकरांनी धुमाकूळ घातला आणि चार एकरांतील पीक उद्‌ध्वस्त केले.

उपरोक्त शेतकऱ्यांच्या शेताला लागून वनविभागाची बंदी असल्याने त्या बंदीत वन्य प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून जागल करावी लागते.

वनविभागाने बंदीला तारकुंपणाची मागणी

इंगलखेड शिवार हे कारंजा वनपरिक्षेत्रात येत असून येथे वनविभागाची बंदी आहे. या बंदीत असलेल्या झाडाझुडपात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. वनविभागाने या बंदीला तार कुंपण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT