Wild Animal Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : खानदेशात पिकांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

Wild Boar Crop Damage : केळी पीक वाढीच्या व निसवणीच्या स्थितीत आहे. अनेकांचे पीक निसवले असून, काढणीवर आहे. या बागांत रानडुकरे रोज पहाटे किंवा मध्यरात्री धुमाकूळ घालतात.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पिकांत डुकरे, रोही, नीलगायी, हरणे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे केळीसह मका, भाजीपाला पिकांची मोठी हानी होत असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

केळी पीक वाढीच्या व निसवणीच्या स्थितीत आहे. अनेकांचे पीक निसवले असून, काढणीवर आहे. या बागांत रानडुकरे रोज पहाटे किंवा मध्यरात्री धुमाकूळ घालतात. झाडांचे नुकसान करतात. यात झाड कोसळून त्यावरील घडाचेही १०० टक्के नुकसान होते.

कारण एकदा झाड कोसळल्यानंतर त्यातून कुठलेही उत्पादन येत नाही. मका, तूर आदीची पेरणीही झाली आहे. या पिकांतही रानडुकरे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत सर्वत्र ही समस्या आहे.

सातपुडालगत रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा या भागांसह सातमाळालगत पाचोरा, चाळीसगाव, जामनेर आणि अन्य वन क्षेत्रांच्या भागात पिकांची हानी वन्यप्राणी करीत आहेत.

अलीकडेच पेरणी केली व ती उद्ध्वस्त झाली, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. जेव्हा पाऊस नसतो, तेव्हाही नुकसान होते व पेरणी, पाऊसमान चांगले राहिल्यास वन्यप्राणी नुकसान करतात. शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागतो, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.\

वन विभागाला या सर्व प्रकाराची माहिती आहे. परंतु नुकसानीनंतर किती शेतकऱ्यांना भरपाई मिळते, हादेखील प्रश्न आहे. ऊस, केळी पिकांत वन्यप्राणी लपून असतात. अनेकदा शेतकऱ्यांवर हल्लेही करतात. दर महिन्याला दोन-तीन शेतकरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होतात. परंतु या समस्येबाबत कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय केले जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT