Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : पांढरं सोनं शेतकऱ्यांसाठी यंदा ठरलं आतबट्ट्याचं; बाजारात कापसाला साधा हमीभावही मिळेना

Cotton Update : कापसाला बाजारात सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. मध्यम धाग्याचा कापसाला हमीभाव ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला.

Anil Jadhao 

Pune News : कापसाला बाजारात सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. मध्यम धाग्याचा कापसाला हमीभाव ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला. पण बाजारात सरासरी बाजारभाव ६ हजार ७०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे उत्पादन कमी होऊनही शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. 

देशात यंदा कापसाची लागवड कमी झाली. त्यातच पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका उत्पादनाला बसला. त्यामुळे कापसाला चांगला भाव मिळले, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदा उत्पादन कमी राहूनही कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. उत्पादनात घट झाल्याने उत्पादन खर्च वाढला. दुसरीकडे कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक तोटा वाढला आहे. बाजारात सध्या कापसाचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ५०० रुपयांपर्यंत कमी आहे. 

कापसाची बाजारातील आवक वाढली आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यकर्ते प्रचारात गुंग असाताना बाजारात कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांवर कमी भावात कापूस विकण्याची वेळ आली. खरे तर यंदा घटलेले उत्पादन आणि निवडणुक यामुळे कापसाला चांगला भाव राहील, असा कयास शेतकऱ्यांनी लावला होता. मात्र झाले उलटे. उत्पादन कमी राहूनही कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. 

हमीभाव आणि बाजारभाव

सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला. तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये हमीभाव आहे. पण सरासरी बाजारभाव सध्या ६ हजार ७०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच लांब धाग्याच्या कापसालाही कमी धाग्याचा हमीभाव मिळताना दिसत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. 

शेतकऱ्यांची नाराजी

यंदा उत्पादन कमी राहूनही शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. रब्बीची पेरणी, दिवाळी सण आणि खर्चासाठी शेतकऱ्यांनी कापूस विकला. कमी भावात कापूस विक्रीची वेळ आल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात आहे. 

सीसीआयची खरेदी

सीसीआयने राज्यात हमीभावाने कापूस खरेदी सुरु केली. मात्र ओलाव्याची अट आणि पेमेंटला लागणारा उशीर यामुळे सीसीआयची खरेदी शेतकऱ्यांना आधार देणारी ठरताना दिसत नाही. शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच कमी भावात कापूस विकावा लागत आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT