Rabbi Intercropping Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Intercropping : कोरडवाहू जमिनीत कोणती आंतरपिके निवडाल?

कोरडवाहू शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. त्यामुळे अशा जमिनीतील ओलाव्याचा पुरेपुर वापर होण्यासाठी आंतरपीक पद्धती फायदेशिर ठरते.

Team Agrowon

कोरडवाहू शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. त्यामुळे अशा जमिनीतील ओलाव्याचा पुरेपुर वापर होण्यासाठी आंतरपीक पद्धती फायदेशिर ठरते.  आता कोरडवाहू जमीनीत जर आंतरपिके घ्यायची झाली तर, पडणाऱ्या पावसानूसार हमखास जास्त उत्पादन देणाऱ्या कोणत्या आंतरपीक पद्धती आहेत? कोणत्या दुबार पीक पद्धती आहेत याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

आंतरपीक पद्धतीमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीवर एकाच वेळी योग्य अंतरावर पेरली जातात.  रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी अधिक हरभरा आणि रब्बी ज्वारी अधिक करडई या आंतरपीक पद्धती जास्त फायदेशिर असल्याच्या दिसून आल आहे. यामध्ये आपल्या जमिनीचा पोत तसेच मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन पिकातील अंतर ठेवायच आहे.      

रब्बी ज्वारी अधिक करडई

रब्बी ज्वारी अधिक करडई ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. वातावरणात जर सतत चढ उतार होत असतील तर अशा ठिकाणी ज्वारी आणि करडईच्या उत्पादनात घट येते. अशा परिस्थितीत जर ज्वारी आणि करडई ही आंतरपिके घेतली तर उत्पादनातील घट कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. ही आंतरपीक पद्धत ६:३ या ओळीच्या प्रमाणात घ्यावी. म्हणजे ज्वारीच्या ६ ओळीनंतर करडईच्या ३ ओळी पेराव्यात. 

करडई अधिक हरभरा

दुसरी फायदेशिर आंतरपीक पद्धती आहे करडई अधिक हरभरा. मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. ४:२ किंवा ६:३ ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धत घेतल्यास जास्त फायदा होतो. म्हणजेच ४ ओळी करडईच्या आणि २ ओळी हरभऱ्याच्या किंवा ६ ओळी करडईच्या आणि ३ ओळी हरभऱ्याच्या अशा पद्धतीने करडई आणि हरभऱ्याची पेरणी करायची आहे. 

दुबार पीक पद्धती  

ज्या जमिनीची खोली एक मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीवर दुबारपीक पद्धत चांगल्याप्रकारे घेता येते.  यामध्ये खरीप हंगामात जर तुम्ही मूग किंवा उडीद  किंवा सोयाबीन जर घेतल असेल तर  रब्बी हंगामात तुम्ही ज्वारी किंवा हरभरा किंवा करडई घेऊ शकता. आणि जर खरीप हंगामात तुम्ही संकरित ज्वारी घेतली असेल तर रब्बी हंगामात  करडई किंवा हरभरा किंवा जवस ही पिके घेऊ शकता. 

रब्बी हंगामात सलग पिकाऐवजी आंतरपीक पद्धतीने पिकाच उत्पादन घेतल तर रब्बी पिकाच अपेक्षित उत्पादन मिळू शकत.  तसच हेक्टरी जास्त उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. याशिवाय आंतरपीक आणि दुबार पीक घेतल्यामुळे कोरडवाहू जमिनीतील ओलाव्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घेता येतो. अशा पद्धतीने रब्बी पिकांच नियोजन केलं तर चांगल उत्पादन मिळू शकत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT