Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : पीकविमा अग्रिम मिळणार तरी कधी?

Crop Insurance Scheme : या हंगामात पावसाचा खंड पडल्याने मिड सिझनअंतर्गत शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई देण्याबाबत प्रशासनाने विमा कंपनीला निर्देश दिलेले असून कंपनीही तयार आहे.

Team Agrowon

Washim News : या हंगामात पावसाचा खंड पडल्याने मिड सिझनअंतर्गत शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई देण्याबाबत प्रशासनाने विमा कंपनीला निर्देश दिलेले असून कंपनीही तयार आहे. मात्र, हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही वळती न झाल्याने शेतकरी प्रतीक्षा करीत थांबलेले आहेत. विमा कंपनी कुठल्या मुहूर्तावर नुकसान भरपाई जमा करते, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

वाशीम जिल्ह्यात ४६ मंडलांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढत विमा कंपनीने २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. कंपनीने जिल्हास्तरीय याविरुद्ध अपीलही दाखल केले होते.

मात्र, सर्वच स्तरावरून हे अपील फेटाळत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय आला. विमा कंपनीने भरपाई द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिकासुद्धा दाखल केली.

न्यायालयात दावा टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर अखेरीस १० नोव्हेंबर रोजी विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास होकार दर्शवला. तसे पत्रसुद्धा कृषी सचिवांना देण्यात आले. कंपनीने लिखित स्वरूपात तसे पत्र दिले होते. मात्र, आता डिसेंबर सुरू झाला तरी विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही.

संकटांची मालिका सुरूच

यंदाच्या खरिपात आधी उशिरा पाऊस झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यानंतर ऑगस्टमध्ये मोठा खंड पडला. सोयाबीनवर येलो मोझॅक आला. यामुळे पीक उत्पादन कमालीची घटले. आता २६ व २७ नोव्हेंबरला पुन्हा अचानकपणे वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

जिल्हयात सर्वच मंडलांमध्ये पाऊस झाला. काही ठिकाणी पिकांचेही नुकसान झाले. अशा संकटाच्या काळात अग्रिम मिळाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा भावना सर्वच स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT