Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अतिवृष्टीची मदत मिळणार तरी कधी?

Crop Damage in Buldana : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या हंगामात सतत पाऊस झाल्याने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासकीय यंत्रणांनी पंचनामेही केले. मदतीची घोषणा होऊन बरेच दिवस लोटले.

Team Agrowon

Buldana Crop Damage News : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या हंगामात सतत पाऊस झाल्याने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासकीय यंत्रणांनी पंचनामेही केले. मदतीची घोषणा होऊन बरेच दिवस लोटले. मदत शासन स्तरावरून थेट खात्यात दिली जाईल, असे स्थानिक यंत्रणा शेतकऱ्यांना वारंवार सांगितले जात आहे.

मात्र अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी, पीकनुकसानीचा निधी जमा होत नसल्याने शेतकरी सातत्याने विचारणा करीत आहेत.

गेल्या खरीप हंगामात जोरदार पावसामुळे शेती खरडून जाण्याचे, पिकांचे नुकसान झाल्याचे प्रकार झालेले आहेत. हजारो हेक्टर शेतीला याचा फटका बसलेला आहे. याबाबत वारंवार पंचनामे करून त्याचे अहवाल शासनाला सादरही झाली.

त्यानंतर मदत निधीची घोषणाही केल्या गेली. पहिल्यांदाच हा निधी थेट शासनस्तरावरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यामुळे मदत निधी कधी जमा होईल, याची माहिती स्थानिक स्तरावर कुठलाही अधिकारी देत नाही.

जिल्ह्यात विविध मंडळांत अतिवृष्टीची मदत जाहीर झालेली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा आला. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. यासाठी कधी आधार लिंक, तर कधी इतर तांत्रिक अडचणी सांगून रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात टाकली जात नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

तर काही लाभार्थी जी खाती वापरात नाहीत, अशा बँकेच्या खात्यांमध्ये पैसे गेले आहेत. हा पैसा काढतानाही अडचणी येत आहेत. पीकविमासुद्धा अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही. त्यामुळे कंपनीने तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT